लस आणि गुंतवळ…

सध्या कोविड लसीकरण (की लशीकरण? काही जण लशीकरण असं लिहितात...जे वशीकरण सारखं वाटतं) जोरात चालू आहे. म्हणजे चर्चा...लस पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरु आहे. अपॉइंटमेंट मिळवणे हा एक मोठा खेळ झाला आहे. रात्री ८ वाजता किंवा अशा विशिष्ट वेळेस अपॉइंटमेंट स्लॉट ओपन होतात आणि अवघ्या काही सेकंदात संपतात देखील! म्हणजे सगळा देश सध्या... Continue Reading →

मराठी विनोद: Vaccination Chaos

पंचेचाळीस वाल्यांची पंगत चालू असताना अठरा वाल्यांची पंगत बसवली. पंचेचाळीस वाल्यांना पुरी पण नाही मिळाली आणि अठरा वाले पत्रावळ्या घेऊन बसलेत….आणि साठी चे पुऱ्या खाऊन भातासाठी थांबले आहेत…त्यात आचारी लंडन ला पळून गेला आहे….आणि वधू वराचे वडील सांगतात कुणीही जेवल्या शिवाय जायचे नाही😂

महाराष्ट्र गाथा: गिरीश कुबेर यांची २ व्याख्याने

नुकतीच लोकसत्ता या दैनिकाने "महाराष्ट्र गाथा" या नावाने मुलाखत/व्याख्यान यांची मालिका सुरू केली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही मालिका सुरू केली असावी. त्यात पहिले दोन भाग हे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचे आहेत जे आवर्जून ऐकावे असे आहेत . तेच इथे शेअर करत आहे...नक्की बघा... https://youtu.be/j9oI3N3jOas https://youtu.be/ShcjkpYK8No त्यानंतरचे १-२ भाग मी पाहण्याचा प्रयत्न... Continue Reading →

संस्कृतपंडित गुलाम बिराजदार यांचे निधन…

मी शाळेत असताना संस्कृत ३ वर्ष शिकलो - ८ वी ते १० वी. त्याआधी मला अनेक संस्कृत श्लोक किंवा स्तोत्र पाठ झालेली होती...पण अर्थ किंवा व्याकरण काहीही समजत नव्हते. शाळेत देखील संस्कृत हे जुजबीच शिकवले होते. म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपाचे...व्याकरण वगैरेची तोंड ओळख. स्वतः वाक्य तयार करणे किंवा अर्थ लावणे यावर भर नव्हताच. कारण संस्कृत... Continue Reading →

मराठी विनोद

मराठीत space bar कुठे आणि कसा वापरायचा ते नीट समजायला हवं . . . "ऐन सणासुदीच्या काळातसोनम हागणार"असं वाक्य वाचलं मी ….🙆‍♀️😂🤣😛

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी

आज भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे (जन्म: ४ फेब्रुवारी २०२२). आज त्यांच्या पुरस्कारांची माहिती वाचताना एक विशेष गोष्ट जाणवली. ती अशी की त्यांना चारही पद्म पुरस्कार मिळाले आहेत — पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न! हे वाचल्यावर मी उत्सुकतेने अजून थोडी माहिती घेतली. आजपर्यंत केवळ ४ जणांना चारही पद्म पुरस्कार मिळाले... Continue Reading →

लेथ जोशी…

लॉक डाऊन च्या काळात अनेक नवीन चित्रपट, वेब सिरीज वगैरे पाहण्याचा योग जुळून आला. त्यात एक अनेक दिवस शोधत असलेला चित्रपट काल अचानक दिसला. त्याचं नाव "लेथ जोशी". २०१८ सालचा हा मराठी चित्रपट खरं तर चित्रपटगृहात कधी रिलीज झाला हेही आठवत नाही. कदाचित झालाच नसेल. पण ह्याचं ट्रेलर पाहून खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक प्लॅटफॉर्म वर मी हा चित्रपट शोधत... Continue Reading →

१० वी ची पंचविशी 

आज ३० जून रोजी आमच्या १०वी चा निकाल लागला त्याला २५ वर्षे पूर्ण झाली...३० जून १९९५! (सुदैवाने मार्क्स चांगले मिळाल्यामुळे त्या अर्थानी "निकाल लागला" नाही). माझ्या शाळेतल्या आणि अजूनही संपर्कात असलेल्या काही मित्रमैत्रिणींना मी WhatsApp वर त्याबद्दल सांगितले, तर त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यापुढची चर्चा रंजक होती...म्हणूनच हा ब्लॉग लिहायचे ठरवले. त्या सर्वांची एक कॉमन प्रतिक्रिया ही "वा! काय मेमरी आहे तुझी... कसं काय... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑