परवा मी सुप्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर याच्या श्रद्धांजली निमित्त आयोजित कार्यक्रम "मुकुंद...एक नॅास्टॅल्जिया" या कार्यक्रमाला गेलो होतो. त्याबद्दल काही लिहावेसे वाटले. मी १९९५ मध्ये दहावी/अकरावी मध्ये असताना झी टीव्हीवर सारेगामा पहायचो. सोनू निगम ॲंकर होता आणि अनेक दिग्गज judges होते. स्पर्धकही दर्जेदार होते. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान ह्या अशाच reality shows मधून पुढे आल्या. त्यातलाच... Continue Reading →
एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत!
पु. ल. देशपांडे यांचा कमी प्रचलित असणारा लेख सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये. आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा... Continue Reading →
मैं तुझे फिर मिलुंगी…अमृता प्रीतम आणि इमरोज
नुकतेच म्हणजे ४ आठवड्यापूर्वी अमृता प्रीतम यांचे जोडीदार कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन झाले. अमृता प्रीतम या प्रसिद्ध कवियत्री, पंजाबी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेत्या होत्या. त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर प्रचंड प्रेम होते. तसे त्यांचे लग्न प्रीतम सिंग यांच्याशी झालेले होते, पण प्रेम साहिरवर. आणि इमरोज (मूळ नाव इंद्रजितसिंग) यांचे अमृता प्रीतम... Continue Reading →
एक नाटक आणि एक मैफल
हा weekend अचानकच Art ला dedicate केल्यासारखं झालं... म्हणजे काल शनिवारी "पुनःश्च हनिमून" हे नाटक पाहिले. आणि आज रविवारी अचानकच एका तबला concert ला जायचा योग आला! ज्या मैत्रिणीनी मला "पुनःश्च हनिमून" नाटक सुचवलं तिचा मेसेज असा होताः "मी हे नाटक पहिल्याच दिवशी पाहिलं. थोडं abstract आहे...प्रायोगिक म्हणता येईल असं. पण तुला आवडेल असं आहे".... Continue Reading →
“सावरकर हे बकरीचा वाघ केलेलं व्यक्तिमत्व” – निरंजन टकले
निरंजन टकले यांचे सावरकांबद्दलचे एक सनसनाटी भाषण मी काही आठवड्यापूर्वी इथे पोस्ट केले होते. आता त्यांचे अजून एक भाषण नुकतेच माझ्या नजरेस पडले. "सावरकर हे बकरीचा वाघ केलेलं व्यक्तिमत्व" असे वादग्रस्त title असलेले हे निरंजन टकले यांचे भाषण डॉ संग्राम पाटील यांनी त्यांच्या youtube चॅनेल वर नुकतेच प्रसिद्ध केले आहे. हे पूर्ण सत्य आहे किंवा अजिबात... Continue Reading →
डॅा. आंबेडकर जयंती निमित्त…
आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. म्हणजे "जय भीम" लोकांचा धुडगूस घालायचा दिवस. आमची शाळा, शाळेतले शिक्षक आणि एकूणच शैक्षणिक अभ्यासक्रम हे अतिशय सुमार दर्जाचे असल्यामुळे कोणत्याही थोर, कर्तबगार व्यक्तींबद्दल यथोचित माहिती आम्हाला मिळाली नाही. जे काही होतं ते प्रचारकी आणि फक्त उदोउदो करणारे. त्यामुळे अशा अनेक व्यक्तींची ओळख नंतर आणि शालाबाह्य माध्यमातून झाली. मला... Continue Reading →
पुणेरी पाट्यांचा जनक
पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ पुणे. आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील पण ह्याचे जनक होते प्रभाकर बाळकृष्ण जोग म्हणजे प्र.बा.जोग! विद्वान माणूस विक्षिप्त असतो अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे. प्र... Continue Reading →
राशी भविष्य, शिंतोडा आणि मालवणी खाज
दैनिक सकाळ मधील रविवारचे राशी भविष्य मी आवर्जून वाचतो. माझा ज्योतिषावर अजिबात विश्वास नसूनसुद्धा! त्याचं कारण म्हणजे श्रीराम भट यांची अगम्य भाषा! भविष्याच्या आधी ते एक छोटासा लेख त्या आठवड्याला अनुसरून लिहीतात...त्यातली भाषा मला फार आवडते. इतके क्लिष्ट, दुर्बोध आणि निरर्थक कसे सुचू शकते याचं नवल वाटतं. उदाहरणार्थः आजचा लेख. "माणूस हा एक देहाहंकाराचा वाराच... Continue Reading →
१५ वर्षांचा जय शंकरपुरे आणि सोशल मीडियाचे मृगजळ
नुकताच मी Youtube वर १५ वर्षांचा जय शंकरपुरे यांच्या शेअर मार्केट मधील प्रवासाबद्दल एक मुलाखत बघितली. अवघ्या ५-६ दिवसात त्याला तीन-सव्वा तीन लाख views मिळाले आहेत. फायनान्स, स्टॉक मार्केट यात रुची, गती असणारे मराठी लोक तसे कमीच आहेत. त्यात इतक्या कमी वयाचे तर जवळजवळ नाहीतच. त्यामुळे जय चे कौतुक केले पाहिजे. त्याची मुलाखत तुम्ही इथे पाहू... Continue Reading →
पुलं, संघ आणि “समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर…?”
मागच्या रविवारी लोकसत्तात रवींद्र पंढरीनाथ यांचा एक वाचनीय लेख आला होता. शीर्षक होते: "समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?" त्याची मध्यवर्ती कल्पना पु ल देशपांडे यांच्या "समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर...?" या एका पुस्तकातील लेखावरून घेतली आहे. मला वाटतं एका दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख नंतर "एक शून्य मी" या त्यांच्या... Continue Reading →

Recent Comments