सुखांत

आज संजय सूरकर दिग्दर्शित ’सुखांत’ हा इच्छामरण या विषयावरचा मराठी चित्रपट पाहीला...फारच चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट आहे!ह्याबद्दल सविस्तर लवकरच...पण शक्य झाल्यास नक्की पहा...चुकवू नका.~ कौस्तुभ

ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे

ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या ...बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली...कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली...पण ते... Continue Reading →

समर्थ रामदास स्वामीं विषयी थोडेसे (बऱ्याच विषयांतरासकट)

नुकतेच मी पुणे मराठी ग्रंथालय इथून समर्थ रामदास यांच्यावरचे एक पुस्तक आणले होते...अचानकच मिळाले आणि जरा चाळल्यावर घ्यावेसे वाटले.तसा मी ’रामदासी’ नाही...म्हणजे रामदासांचे जास्त काही वाचलेले नाही...त्या मानाने तुकारामांना बरेच follow करतो...रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे... Continue Reading →

ह्यावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

नुकतीच सा रे ग म प ची मेगाफायनल झाली - ह्या वेळच्या पर्वाबाबत निर्णयाची उत्सुकता मला कमी होती...कारण सगळेच professional singers होते. ह्या वेळच्या पर्वाचे मुख्य आकर्षण हे स्पर्धक नसून परिक्षक होते...पण एकूणच त्यांचे ’विवेचन’ आणि ’प्रवचन’ आणि सल्ले ऐकल्यावर त्यापेक्षा देवकी पंडीत बरी असे वाटायला लागले...गाण्यापेक्षा सुरेश वाडकर आणि ह्रुदयनाथ मंगेशकर यांचा mutual admiration... Continue Reading →

जीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा

आयुर्वेद आणि माझे तसे फारसे सख्य नाही...म्हणजे मला त्याबद्दल वाट्टेल ते ’claim’ करणारे लोक आवडत नाही...आणि विनाकारण इतर उपचार पद्धती वर टीका करणेही आवडत नाही...पण आपल्या so-called भारतीय संस्क्रुती मधलाच हा दोष असावा... अहंमन्यतेनी पछाडले असण्याचा. मग ते हिंदू धर्माच्या बाबतीत असो, किंवा हिंदु संस्क्रुती/ पुराण असो, रामदेव बाबांचे ’योग’ आणि ’प्राणायाम’ असो की, हिंदू... Continue Reading →

’शब्दबंबाळ’ मराठी भाषा आणि सावरकर

परवाच ’महराष्ट्र दिन’ झाला (खरे तर सद्यस्थिती पाहाता ’महाराष्ट्र दीन’ असे म्हटले पाहिजे)... त्यानिमित्त ’सकाळ’ मध्ये माधव गाडगीळ यांचा मराठी भाषेबद्दल एक लेख आला आहे. माधव गाडगीळ हे जुन्या काळातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांचे सुपुत्र - आणि ते स्वतःदेखील शास्त्रज्ञ आहेत. मराठीत साधे आणि सोपे शब्द प्रचलीत करण्यापेक्षा क्लिष्ट आणि दुर्बोध शब्द वापरण्याकडेच तथाकथित... Continue Reading →

Gym आणि फ्यामिली डॊक्टर

नुकतेच आमच्या Gym मध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले  (मी मराठी माध्यमाचा असल्यामुळे मी आधी ’व्यायाम शाळा’ असे म्हणायचो. ते ऐकून लोक नाकं मुरडायचे. ’Gym’ कसं त्यांना ’sophisticated’ वाटते. म्हणजे जागा तीच. फक्त नाव बदललं की एकदम त्याचा ’क्लास’ बदलतो. असो.)आधी लेडीज Gym च्या वेळा (Gym च्या वेळा ...काय रचना आहे... ’गाड्यांना खूप गर्द्या होत्या’ सारखे) वेगळ्या होत्या... Continue Reading →

दिवस फार कठीण आहेत…

नुकतेच आमच्या एका प्रोजेक्ट मीटिंग मध्ये मी माझ्या manager ला सांगितले: ’माझ्या टीम मधला एक जण resign करणार आहे अशी कुणकुण मला लागली आहे’ (अर्थात हे मी इंग्लिश मध्ये सांगितले - आत इंग्लिशमध्ये मी ’कुणकुण लागली आहे’ हे कसे म्हटले असले प्रश्न विचारु नका. भावना लक्षात घ्या! तर कुठे होतो मी - हा,  कुणकुण लागली...)तर... Continue Reading →

Calendar विषयी थोडेसे…

'हा हा' म्हणता January २००७ संपत आला. 'ही: ही:' म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि 'संपत आला असता' म्हणजे 'संपत' नावाचा माणूस नाही, 'महीना संपतच आला असता'...शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)नुकतीच TV वर... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑