पण…का?

आजच्या "सकाळ" मधली ही बातमी वाचून हे लिहावेसे वाटले...जे बरेच दिवस मनात होते. माणसाला छंद, विरंगुळा असावेत. किंबहुना माणसाने छंदांसाठी जगावे असे अनेक लोकांना वाटते. त्यात जास्त करून कलाकार, साहित्यिक यांची संख्या जास्त असते. किंबहुना पु.ल. देशपांडे यांचे त्या अर्थाचे हे वाक्य अनेकदा समाजमाध्यमात फिरत असते. "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या... Continue Reading →

शुभ दीपावली…🪔🪔🪔

दिवाळीच्या शुभेच्छा देणारच असाल तर साधं सरळ "शुभ दीपावली" असं म्हणून wish करा… उगाच, दिवा तुमच्या दारी, माती-नाती, पणती वगैरे कविता लिहीत बसू नका. कुणीही वाचत नाही. असो. आता मी माझ्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो...🪔🪔🪔 👇👇👇🤣🤣🤣

यंदा कर्तव्य आहे…

​परवा मला एक जुनी ई-मेल सापडली. २००३ सालची. म्हणजे माझ्या तरुणपणीची...  माझा इंजिनीअरिंग चा मित्र पुढे माझ्याच कंपनीमध्ये (इन्फोसिस) आला. तेव्हा ​आम्ही २३ वर्षांचेअसत असू! लग्न वगैरे विचार खूप लांब होते. पण त्या मित्राच्या घरी "यंदा कर्तव्य आहे" चं प्रेशर चालू झालं होतं. त्यावरून मी त्या मित्राला चिडवायचो. त्याचे नाव तेजस. तो अहमदनगरचा होता. (हो,... Continue Reading →

लस आणि गुंतवळ…

सध्या कोविड लसीकरण (की लशीकरण? काही जण लशीकरण असं लिहितात...जे वशीकरण सारखं वाटतं) जोरात चालू आहे. म्हणजे चर्चा...लस पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरु आहे. अपॉइंटमेंट मिळवणे हा एक मोठा खेळ झाला आहे. रात्री ८ वाजता किंवा अशा विशिष्ट वेळेस अपॉइंटमेंट स्लॉट ओपन होतात आणि अवघ्या काही सेकंदात संपतात देखील! म्हणजे सगळा देश सध्या... Continue Reading →

मराठी विनोद: Vaccination Chaos

पंचेचाळीस वाल्यांची पंगत चालू असताना अठरा वाल्यांची पंगत बसवली. पंचेचाळीस वाल्यांना पुरी पण नाही मिळाली आणि अठरा वाले पत्रावळ्या घेऊन बसलेत….आणि साठी चे पुऱ्या खाऊन भातासाठी थांबले आहेत…त्यात आचारी लंडन ला पळून गेला आहे….आणि वधू वराचे वडील सांगतात कुणीही जेवल्या शिवाय जायचे नाही😂

मराठी विनोद

मराठीत space bar कुठे आणि कसा वापरायचा ते नीट समजायला हवं . . . "ऐन सणासुदीच्या काळातसोनम हागणार"असं वाक्य वाचलं मी ….🙆‍♀️😂🤣😛

विनोद: परस्त्री…

परस्त्री वाईट असतेहे नेहमीचं वाक्य तो बोललातेव्हा मला फार काही नाही वाटले, पण… परस्त्री कठीण आहेपरस्त्री हाताबाहेर चालली आहेपरस्त्री आटोक्यात येत नाहीही वाक्य बुचकळ्यात टाकणारी होती. मग त्याने तोंडातला माणिकचंद थुंकल्यावर कळलं,कि तो परिस्थिती विषयी बोलतोय..! 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑