The Mathematical Magic of Indian Music (a TEDx Talk in Marathi Language)

प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले यांचा मराठीतील TEDx Talk "The Mathematical Magic of Indian Music" या विषयावर... https://youtu.be/9Vjepp2bp0g?si=qBe-g82tahpI6u3I यासारखेच दुसरे एक lecture पं. (डॅा) अरूण द्रविड यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर च्या कार्यक्रमात दिले होते ते देखील अतिशय सुंदर आहे. ते पण इथे पोस्ट करत आहे... https://youtu.be/YnieweyXW-A?si=YGhDaqxGWCcRHhYG

“दुर्दैवी” मुकुंद फणसळकर, श्रद्धांजली आणि Good Will Hunting

परवा मी सुप्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर याच्या श्रद्धांजली निमित्त आयोजित कार्यक्रम "मुकुंद...एक नॅास्टॅल्जिया" या कार्यक्रमाला गेलो होतो. त्याबद्दल काही लिहावेसे वाटले. मी १९९५ मध्ये दहावी/अकरावी मध्ये असताना झी टीव्हीवर सारेगामा पहायचो. सोनू निगम ॲंकर होता आणि अनेक दिग्गज judges होते. स्पर्धकही दर्जेदार होते. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान ह्या अशाच reality shows मधून पुढे आल्या. त्यातलाच... Continue Reading →

ह्रृदयनाथ मंगेशकर यांच्या लता मंगेशकरांच्या आठवणी आणि माझे मत

नुकतेच मी ह्रृदयनाथ मंगेशकर यांच्या लता मंगेशकरांच्या आठवणींची दीर्घ मुलाखत ABP माझा वर पाहिली. २ भागांतली ही मुलाखत मला आवडली. मंगेशकर family बद्दलचे माझे मत कालपरत्वे बदलत गेले आहे. एके काळी निस्सिम चाहता होतो, ते त्यांच्या संगीतातल्या योगदानामुळे. ते योगदान अजूनही मान्यच आहे. पण पुढे त्यांचे राजकीय विचार, आपल्या लाडक्या "दैवतांचा" उदोउदो करायची पद्धत, बऱ्याच... Continue Reading →

Nostalgia, उतारवय आणि आमचे शिक्षक

You become old when your memories are stronger than your dreams. When you spend more time in nostalgia. माझे आणि माझ्या शाळेचे नाते हे कडू-गोड आहे. काय ती थोर शाळा, काय ते शिक्षक, काय ते दिवस...असं वाटून उगाच हुंदका येणाऱ्यातला मी नाही. तरीही जेव्हा मी अचानक हा व्हिडीओ Youtube वर पाहिला तेव्हा तो पूर्ण पाहण्याचा... Continue Reading →

कुमार गंधर्व @ १००

काल, म्हणजे ८ एप्रिल २०२४ हा दिवस म्हणजे कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी होती. सध्या निवडणूकांची धामधूम असल्यामुळे शासन, माध्यमे यांना त्याचा विसर पडला असावा. लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात एक लेख होता, पण बाकी विशेष काही नाही. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर हे शास्त्रीय संगीतातील माझ्या आवडीचे गायक कलाकार आहेत, पं. अभिषेकी, वसंतराव देशपांडे हे देखील... Continue Reading →

राहुल देशपांडे ची “अमुक तमुक” वरील मुलाखत

नव्या पिढीतल्या, आजच्या मराठी संगीत कलाकारांमध्ये मला राहुल देशपांडे आवडतो. कधी कधी काही काही गोष्टी आवडत नाही...पण एकूण सध्या तरी आवडणाऱ्या गोष्टी खूप जास्त आहेत. सध्या तरी म्हणायचं कारण असं की हल्ली कोणाबद्दलही शाश्वती देता येत नाहीत. त्यामुळे कायम उदो उदो करावेत असे फार कमी लोक आहेत. असो.  अमुक तमुक ह्या पॉडकास्ट चा होस्ट मला आवडत... Continue Reading →

श्रीधर फडके यांची सुश्राव्य गाणी

सध्या, म्हणजे जानेवारी २०२४ पासून मी परत एकदा श्रीधर फडके यांची गाणी जास्त प्रमाणात ऐकत आहे. काही नवीन गाणीही ऐकायला मिळाली. श्रीधर फडके यांचं माझ्या आयुष्यात एक विशेष स्थान आहे. विशेष आठवणी आहेत. त्यांची गाणी मला खूपच सुमधूर आणि वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. आणि बरेचदा माझ्या प्रकृतीला किंवा स्वभावाला साजेशी वाटतात. सुरेश वाडकर यांचा आवाज श्रीधर... Continue Reading →

ए. आर. रेहमान, खान मंडळी आणि वाढते वय

आज ६ जानेवारी - ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रेहमान चा वाढदिवस. हा हा म्हणता ५८ वर्षांचा झाला! ट्विटरवर कोण्या एका रेहमान विषयक थ्रेड मध्ये त्याची सुप्रसिद्ध गाणी एकाने दिली होती. सगळी २००९ नंतरची. नंतर उलगडा झाला की त्याचा जन्मच २००० चा होता. त्यामुळे त्याच्या लहानपणी म्हणजे २००८-०९ ला तो रेहमान ला follow करायला लागला... Continue Reading →

The Rahul Deshpande Collective: तू जहाँ जहाँ चलेगा आणि “नंद” राग

राहुल देशपांडे चा Youtube चॅनेल मी नियमितपणे बघतो. आधी त्यांनी त्याच्या रियाझाचे, सहज गातानाचे व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर काही कलाकारांबरोबर collaboration करत काही गाणी record केली. आता त्याने The Rahul Deshpande Collective नावाने एक उपक्रम सुरु केला आहे ज्यात तो एखादे गाणे सादर करतो, आणि मग त्या गाण्याबद्दलची माहिती सांगतो आणि मग त्याच्या पद्धतीने... Continue Reading →

एक नाटक आणि एक मैफल

हा weekend अचानकच Art ला dedicate केल्यासारखं झालं... म्हणजे काल शनिवारी "पुनःश्च हनिमून" हे नाटक पाहिले. आणि आज रविवारी अचानकच एका तबला concert ला जायचा योग आला! ज्या मैत्रिणीनी मला "पुनःश्च हनिमून" नाटक सुचवलं तिचा मेसेज असा होताः "मी हे नाटक पहिल्याच दिवशी पाहिलं. थोडं abstract आहे...प्रायोगिक म्हणता येईल असं. पण तुला आवडेल असं आहे".... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑