“झाड”: एक कविता

कविता आणि मी - हे समीकरण फारसं कधी जुळंल नाही (कविता म्हणजे - काव्य...कविता नावाचा इतर कुठलाही पदार्थ आमच्या अवतीभवती नाही)...तर मी कवितेत फारसा रमलो नाही कारण मला त्यातले फारसे कधी कळलेच नाही...  (’आपल्याला एखाद्या गोष्टीतले कळंत नाही’ हेच बऱ्याच लोकांना कळंत नाही...मला ते कळते आणि ते मी मान्य करतो हे काय कमी आहे?). आमचे मास्तर,... Continue Reading →

एक कूटप्रश्न (puzzle)

तुमच्या जवळ ३००० केळी आणि ५ हत्ती आहेत. ती तुम्हाला पुण्याहून दिल्लीपर्यंत (१००० कि.मी धरा) न्यायची आहेत. पण -१. एक हत्ती जास्त्तीत जास्त १००० केळी नेऊ शकतो.२. प्रत्येक कि.मी. नंतर एका हत्तीला एक केळे लागते. नाहीतर तो पुढे जाणार नाही.३. हत्तीला तुम्ही वाटेतच सोडू शकता.सांगा पाहू तुम्ही जास्त्तीत जास्त किती केळी दिल्ली पर्यंत न्याल ?~ कौस्तुभ

’शब्दबंबाळ’ मराठी भाषा आणि सावरकर

परवाच ’महराष्ट्र दिन’ झाला (खरे तर सद्यस्थिती पाहाता ’महाराष्ट्र दीन’ असे म्हटले पाहिजे)... त्यानिमित्त ’सकाळ’ मध्ये माधव गाडगीळ यांचा मराठी भाषेबद्दल एक लेख आला आहे. माधव गाडगीळ हे जुन्या काळातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांचे सुपुत्र - आणि ते स्वतःदेखील शास्त्रज्ञ आहेत. मराठीत साधे आणि सोपे शब्द प्रचलीत करण्यापेक्षा क्लिष्ट आणि दुर्बोध शब्द वापरण्याकडेच तथाकथित... Continue Reading →

माझे मन तुझे झाले…

झी मराठी वरील सा रे ग म प  मधील गाणे माझे मन तुझे झाले मूळ गाणे: दूरदर्शन मालिका ’स्वामी’ - शीर्षक गीतगीत-संगीतः सुधीर मोघेमूळ गायिका: सूचित्रा बर्वे सा रे ग म प  मधील गायिका: विभावरी आपटे-जोशी~ कौस्तुभ ह्या गाण्याची मूळ MP3 माझ्याकडे आहे (though Quality is low)

Gym आणि फ्यामिली डॊक्टर

नुकतेच आमच्या Gym मध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले  (मी मराठी माध्यमाचा असल्यामुळे मी आधी ’व्यायाम शाळा’ असे म्हणायचो. ते ऐकून लोक नाकं मुरडायचे. ’Gym’ कसं त्यांना ’sophisticated’ वाटते. म्हणजे जागा तीच. फक्त नाव बदललं की एकदम त्याचा ’क्लास’ बदलतो. असो.)आधी लेडीज Gym च्या वेळा (Gym च्या वेळा ...काय रचना आहे... ’गाड्यांना खूप गर्द्या होत्या’ सारखे) वेगळ्या होत्या... Continue Reading →

दिवस फार कठीण आहेत…

नुकतेच आमच्या एका प्रोजेक्ट मीटिंग मध्ये मी माझ्या manager ला सांगितले: ’माझ्या टीम मधला एक जण resign करणार आहे अशी कुणकुण मला लागली आहे’ (अर्थात हे मी इंग्लिश मध्ये सांगितले - आत इंग्लिशमध्ये मी ’कुणकुण लागली आहे’ हे कसे म्हटले असले प्रश्न विचारु नका. भावना लक्षात घ्या! तर कुठे होतो मी - हा,  कुणकुण लागली...)तर... Continue Reading →

असेच काही तरी: नवीन जोक-बुक

परवा एका मित्राकडे गेलो होतो तेव्हा त्याने ’जोक-बुक’ चा नवीन अंक दाखवला. जोक बुक म्हणजे एका प्रसिद्ध ’विवाह-मंडळाचा’ मासिक अंक. आम्ही त्याला ’जोक-बुक’ म्हणतो.हसून हसून गडाबडा लोळावे असे ’नमुने’ असतात त्यात. काहींचे तर पान भर फोटो पण असतात, कट्रिना किंवा ह्रितिक ला लाजवतील असे मोडेलिंग करत... (बहुतेक फोटो ’जय बजरंग फोटो स्टुडिओ’ वगैरे ठिकाणी काढलेले... Continue Reading →

सा रे ग म प – लिटिल च्याम्प आणि एक आयडिया

आज ’सा रे ग म प’ ची मेगा-फाईनल...सगळ्या मराठी लोकांचे डोळे त्याच्या निकालाकडे लागले आहेत...सध्या आमच्याकडचे वातावरण ’सा रे ग म प’ मय झाले आहे...सगळे जण संगीतातले दर्दी असल्या सारखे सारेगम ची भाषा वापरतात...फक्त कार्यक्रमाच्या बाबतीतच असे नाही तर एकुणच...म्हणजे आई माझ्यावर चिडली की पूर्वी म्हणायची "कौस्तुभ, तुला धपाटा देइन बरं का..." आता म्हणते "कौस्तुभ... Continue Reading →

विनोद

 एक सुंदर अभिनेत्री बोटीने लांबची समुद्रसफ़र करण्यास निघाली. तिने बोटीवर असताना लिहीलेल्या दैनंदिनीतील काही भाग -दि. ०७ ऒक्टोंबर - प्रवासास आरंभ झाला. बोटीत १५०० प्रवासी आहेत. डेकवर फिरताना जहाजाच्या कप्तानाशी ओळख झाली.दि. ०८ ऒक्टोंबर - आज मी आणि कप्तान डेकवर खूप वेळ एकत्र फिरलो. आम्ही खूप गप्पा मारल्या.दि. ०९ ऒक्टोंबर - कप्तानाशी दोस्ती खूपच वाढली.दि.... Continue Reading →

विनोद

अगदी रमतगमत चालत असलेल्या सुभेदार बंताला पाहून मेजर संता कडाडला, ”सुभेदार बंता, हा युद्धसराव सुरू आहे. काल्पनिक शत्रू समोरून अतिशय वेगानं आपल्या दिशेनं सरकतोय. प्रचंड काल्पनिक गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या काल्पनिक धुमश्चक्रीत तू अडकला आहेस.”बंतानं ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली, दोन गिरक्या घेऊन तो एका जागी तो उठून बसला.ते पाहून चक्रावलेल्या संतानं विचारलं,... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑