गणपती बाप्पा मोरया... सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! मला स्वतःला गणपती उत्सव लाभत नाही असा माझा अनुभव आहे. अनेक वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशीच, किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे काही वाईट, त्रासदायक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आहेत, किंवा घडतात. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. त्याबद्दल लवकरच वेगळ्या ब्लॉग मध्ये लिहीन. पण असे असले तरी मला गणपती देवता,... Continue Reading →
१५ अॅागस्ट
१५ अॅागस्ट हा दिवस माझ्यासाठी एक खास आठवणीतला दिवस होता. त्याचा संबंध स्वातंत्र्यदिन किंवा देशप्रेम यांच्याशी नव्हता तर एका वैयक्तिक आठवणीशी, व्यक्तीशी, नात्याशी होता. आजचा १५ अॅागस्ट हा एका नव्या कारणासाठी महत्वपूर्ण आहे. एका नव्या सुरूवातीसाठी, एका नव्या शक्यतेसाठी. Bucket List मधला (अजून) एक item पूर्ण झाला! आता अजून एक खूप वर्षांपासून मनात योजलेली गोष्ट... Continue Reading →
निरर्थक पाठांतर, संस्कृत आणि कालिदास
नुकतेच Twitter वर एक tweet वाचले आणि हे लिहायचे ठरवले. "तुम्ही पाठ केलेली किंवा तुमच्या स्मरणात असलेली सगळ्यात निरर्थक गोष्ट कोणती?" असा प्रश्न होता. त्यावर एकानी "पठ" चं संस्कृत शब्द रूप (म्हणजे शब्द चालविणे) याचं उदाहरण दिलं आणि त्यावरून माझ्या मनात बरेच विचार आले. कारण त्याबद्दल मीदेखील अनेकदा विचार करतो. कित्येक गोष्टी माझ्या स्मरणात आहेत ज्या म्हटलं... Continue Reading →
ए. आर. रेहमान, खान मंडळी आणि वाढते वय
आज ६ जानेवारी - ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रेहमान चा वाढदिवस. हा हा म्हणता ५८ वर्षांचा झाला! ट्विटरवर कोण्या एका रेहमान विषयक थ्रेड मध्ये त्याची सुप्रसिद्ध गाणी एकाने दिली होती. सगळी २००९ नंतरची. नंतर उलगडा झाला की त्याचा जन्मच २००० चा होता. त्यामुळे त्याच्या लहानपणी म्हणजे २००८-०९ ला तो रेहमान ला follow करायला लागला... Continue Reading →
सहज सुचलेलं…
नवीन वर्षांत तारीख लिहीताना जुनेच वर्षं लिहीले असे तुमच्या बाबतीत होते का? होत असेल तर किती दिवस? माझे खूप पूर्वी व्हायचे तसे. पण हल्ली गेली ८-९ वर्षे अजिबात होत नाही. गतवर्षांत रेंगाळण्यासारखं हल्ली काहीच घडत नाही. त्यामुळे असेल कदाचित…

Recent Comments