-------------------------------------------------------------- मागच्या आठवड्यात मला माझ्या प्राथमिक शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते त्याबद्दलचा हा वृत्तांत आणि व्यक्त न केलेले मनोगत. -------------------------------------------------------------- माझी प्राथमिक शाळा म्हणजे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची "नवीन मराठी शाळा" जिची स्थापना विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी ४... Continue Reading →
Indian Idol आणि आठवणींचा पाऊस…
काल आणि परवा घरी Indian Idol बघत होतो. मी एकटाच...कारण बाकीच्यांना तितकासा interest नव्हता. नेमके चांगले गाणे चालू असताना फोन, एकमेकांच्यात गप्पा, बडबड यामुळे माझी चिडचिड झाली आणि मी तसे बोलून दाखवल्यावर साहजिकच थोडे भांडण, उत्तराला प्रत्युत्तर झाले. त्यानंतर सगळे शांत...आणि मी एकटाच TV समोर बसून उर्वरीत कार्यक्रम बघत होतो. तेव्हा अचानक मला दोन व्यक्तींची तीव्र... Continue Reading →
RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची एक अतिशय सुंदर मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. RSS ची १०० वर्षे, स्वामी विवेकानंद आणि संघाचा दुतोंडीपणा याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन दाभोळकर यांनी केले आहे. मी माझ्या अनेक संघी मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवली आहे. तुम्ही पण जरून ऎका. https://www.youtube.com/watch?v=abkXpMCv-rI
[Marathi] The Life and Legacy of Dr. R. G. Bhandarkar
Dr. R. G. भांडारकर यांच्या निधनाला नुकतीच म्हणजे २४ ऑगस्ट २०२५ ला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या Dr. प्रदीप आपटे यांनी Dr. गौरी मोघे यांनी घेतलेली मुलाखत नक्की बघा. https://www.youtube.com/watch?v=Mek_oIYHyjs
आयुष्यावर बोलू काही: २२ वर्षे
आयुष्यावर बोलू काही ला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमुक तमुक या पॉडकास्टवर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा २ तासांची मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली. सलील कुलकर्णी हा आगाऊ असला तरी विचारी आणि ओरिजिनल आहे. संदीप खरे मला आवडतो. त्यामुळे हा पॉडकास्ट मला बघायचा आहे. सुरु केलाय, आणि सुरुवात तरी चांगली वाटली https://www.youtube.com/watch?v=Q8knkYb5lZA
AI ची जादू आणि उद्याचे जग – श्री. अच्युत गोडबोले | Magic of AI & the world tomorrow – Achyut Godbole
अच्युत गोडबोले यांनी नुकतेच "AI ची जादू आणि उद्याचे जग" या विषयावर एक अतिशय माहितीपूर्ण आणि रसाळ व्याख्यान दिले. अच्युत गोडबोले हे अतिशय विद्वान आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी तळमळ असलेले व्यक्ती आहेत. बरेचदा ते पाल्हाळ लावतात आणि आत्मप्रौढी देखील बऱ्याच प्रमाणात असते. पण त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि चांगल्या हेतूबद्दल शंकाच नाही. अजून ए चांगली गोष्ट म्हणजे ते... Continue Reading →
इतिहास कट्टा भाग 01 I फारसी भाषेचा संपूर्ण इतिहास विथ निखिल परांजपे I Farsi Language History
इतिहास कट्टा भाग 01 I फारसी भाषेचा संपूर्ण इतिहास विथ निखिल परांजपे I Farsi Language History https://youtu.be/2q00A-N24J4?si=pMpv9tMxpnEuVm6G
मराठीच्या विविध बोलीभाषा
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बरेचदा नवीन चांगली माहिती समजते. त्यातलीच एक आज वाचली - मराठी भाषेतल्या विविध बोलीभाषांची समग्र यादी. एकूण ९४ बोलीभाषा आहेत! ह्यातल्या किती आपल्याला परिचित आहेत? आणि समजतात किंवा बोलता येतात?
राहुल देशपांडे अभिनित “अमलताश” विषयी
राहुल देशपांडे अभिनित "अमलताश" हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी येऊन गेला. हा खरं तर त्याचा पहिला चित्रपट... "मी, वसंतराव" च्या ही आधीचा. पण तो खूप उशिरा प्रदर्शित झाला. थिएटर मध्ये कधी आला आणि कधी गेला ते समजलंच नाही. नंतर तो OTT वर आला तेव्हा मी एकदा पहायला सुरुवात केली होती, पण जेमतेम 10 मिनिटे पाहिल्यावर काही... Continue Reading →
२०२४ दिवाळीच्या हसऱ्या शुभेच्छा! 🪔🪔🪔
दिवाळीच्या दिवसात शुभच्छांच्या मेसेजेसचा भडीमार असतो. बरं मेसेजही स्वतः कष्ट घेऊन लिहीलेले असतील तरी ठीक आहे. पण बहुतेक वेळेस मेसेजेस forward केलेले असतात. म्हणजे माझ्या आईच्या भाषेत पुढे ढकललेले असतात. म्हणून मी परवा एका मित्राला आधीच सल्ला वजा इशारा दिलाः "साधं सरळ "शुभ दीपावली" म्हणून wish करा... उगाच, दिवा तुमच्या दारी, माती-नाती, पणती वगैरे कविता... Continue Reading →

Recent Comments