मला लहानपणी (म्हणजे १९८०-९० च्या दशकात) मराठी चित्रपट सृष्टीतले हिरो/चरित्र कलाकार जास्त आवडायचे - अशोक सराफ सर्वात जास्त. तसेच दिलीप प्रभावळकर आणि श्रीराम लागू सुद्धा. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे कधीकधी, सरसकट नाही. अभिनेत्री तशा कमी आवडायच्या...हिंदी चित्रपट सृष्टीमधल्याच जास्त आवडायच्या. पण तरीही मराठी मधल्या किशोरी शहाणे आणि थोड्या प्रमाणात वर्षा उसगांवकर आवडायच्या. त्यानंतरच्या काळात म्हणजे... Continue Reading →
भाडीपा पॉडकास्ट: “मुलांना जन्म द्यायचा का?”
भाडीपा हा मराठी मधल्या त्यातल्या त्यात चांगल्या पॉडकास्ट पैकी एक आहे. त्यांचे कॉमेडी चे विविध प्रकार चांगले असतातच परंतु इतर प्रकारचे contents, म्हणजे मुलाखती, चर्चा, शॉर्ट फिल्म वगैरे, पण चांगले असतात. ह्या चॅनेलवर नुकतीच "ऐकावं जनाचं करावं मनाचं" ह्या चर्चेच्या सिरीजमध्ये "मुलांना जन्म द्यायचा का?" या शीर्षकाची एक चर्चा झाली. खूप वेग-वेगळ्या पैलूंबद्दल त्यात मते मांडण्यात आली. मते... Continue Reading →
मैं तुझे फिर मिलुंगी…अमृता प्रीतम आणि इमरोज
नुकतेच म्हणजे ४ आठवड्यापूर्वी अमृता प्रीतम यांचे जोडीदार कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन झाले. अमृता प्रीतम या प्रसिद्ध कवियत्री, पंजाबी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेत्या होत्या. त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर प्रचंड प्रेम होते. तसे त्यांचे लग्न प्रीतम सिंग यांच्याशी झालेले होते, पण प्रेम साहिरवर. आणि इमरोज (मूळ नाव इंद्रजितसिंग) यांचे अमृता प्रीतम... Continue Reading →
ए. आर. रेहमान, खान मंडळी आणि वाढते वय
आज ६ जानेवारी - ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रेहमान चा वाढदिवस. हा हा म्हणता ५८ वर्षांचा झाला! ट्विटरवर कोण्या एका रेहमान विषयक थ्रेड मध्ये त्याची सुप्रसिद्ध गाणी एकाने दिली होती. सगळी २००९ नंतरची. नंतर उलगडा झाला की त्याचा जन्मच २००० चा होता. त्यामुळे त्याच्या लहानपणी म्हणजे २००८-०९ ला तो रेहमान ला follow करायला लागला... Continue Reading →
“आत्मपॅम्फ्लेट” विषयी…
परेश मोकाशीचा "हरिश्चंद्राची फ़ॅक्टरी" हा चित्रपट मला आवडला होता. नेहेमीच्या मराठी सुमार विनोदपटांच्या कचऱ्यात मोकाशीचा विनोदाचा sense आणि treatment खूपच दर्जेदार वाटली. पण तरी तो विशेष लक्षात राहावा असे वाटले नाही. पण ह्या वर्षाच्या सुरुवातीला आलेला "वाळवी" ह्या चित्रपटाने परत एकदा परेश मोकाशीच्या दर्जाची जाणीव झाली. Black Comedy प्रकारचा चित्रपट मराठीत बनतच नाही...त्यामुळे वाळवी विशेष आवडला. त्यानंतर... Continue Reading →
The Rahul Deshpande Collective: तू जहाँ जहाँ चलेगा आणि “नंद” राग
राहुल देशपांडे चा Youtube चॅनेल मी नियमितपणे बघतो. आधी त्यांनी त्याच्या रियाझाचे, सहज गातानाचे व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर काही कलाकारांबरोबर collaboration करत काही गाणी record केली. आता त्याने The Rahul Deshpande Collective नावाने एक उपक्रम सुरु केला आहे ज्यात तो एखादे गाणे सादर करतो, आणि मग त्या गाण्याबद्दलची माहिती सांगतो आणि मग त्याच्या पद्धतीने... Continue Reading →
सेक्स एज्युकेशन या विषयावरचा मराठी पॉडकास्ट
मराठी पॉडकास्ट आता हळूहळू रुजत आहेत. गेल्या काही आठवड्यात मी २-३ पॉडकास्ट बद्दल लिहिलं आहे. अजूनही Spotify सारख्या ऍप्स वर मराठी पॉडकास्ट दिसत नाहीत. पण Youtube चॅनेल च्या माध्यमातून मुलाखत या स्वरूपात मराठी पॉडकास्ट सुरु झाले आहेत. अनेक पॉडकास्ट अजूनही पाचकळ, उथळ, करमणूक स्वरूपाच्या गप्पा यावरच भर देत आहेत. त्यांना मी जमेत धरत नाही. पण... Continue Reading →
मराठी बिझनेस पॉडकास्ट
नुकतेच मी माझ्या ब्लॉगमध्ये मराठी पॉडकास्ट बद्दल लिहिले...की मराठी पॉडकास्ट मुळातच कमी आहेत त्यामुळे त्यातल्या त्यात बरे पॉडकास्ट सुद्धा चांगले वाटतात. तसेच, अँकर कितीही सुमार असला तरी जर गेस्ट चांगले असतील तर मुलाखत पाहण्यासारखी/ऐकण्यासारखी होते. असाच अजून एक मराठी पॉडकास्ट माझ्या पाहण्यात आला. त्यात वेगवेगळे segment आहेत. त्यातला एक segment बिझनेस/व्यवसाय याविषयीचा आहे. त्यातच २ नुकतेच... Continue Reading →
आठवणीतली कविता: “हळूच त्यातून सटकायचं”
माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे पापड, कुरडया करण्याचा कार्यक्रम असायचा. आमच्या वाड्यात आजी, आणि तिच्या मैत्रिणी, आई, काकू, वगैरे अंगणात पापड, कुरडई वगैरे लाटायचे. मग ते वाळत घालणे, वळवाचा पाऊस आला की उचलणे ही कामं आम्हा मुलांची असायची. त्यावेळच्या अनेक आठवणींपैकी एक ठळक आठवण म्हणजे, माझ्या आजीची एक मैत्रीण होती, तिला "य" आजी म्हणू... ती कविता, गाणी... Continue Reading →
विरंगुळाः मराठी वृत्तपत्रांची शोचनीय अवस्था
फरूळेकरांकडून फवारांकडे गेलेल्या फेफरचे संफादक, उफसंफादक, फ्रूफरिडर, फत्रकार आणि समस्त फिंफरीकर आणि फुणेकरांनी, कॉफीमुक्त फरीक्षेसाठी गेलेल्या फथकाला फुरेफुर फ्रयत्न करण्यासाठी फ्रोत्साहन द्यावे !!! #मराठीठारमारी

Recent Comments