Search

ekoshapu

Notes to Myself

Month

July 2006

Two Monks

“Two monks were traveling together when they came across a river crossing. There on the bank, they saw a beautiful woman, finely dressed, who wished to cross the river but was unable to do so. Without a word, the older monk simply picked up the woman and carried her to the other side.

The young monk, seemingly agitated for the rest of their journey, could not contain himself. Once they reached their destination after a couple of days, he exploded at the older monk. “How could you, a monk, even consider carrying a woman in your arms, much less a young and beautiful one? It is against our teachings. It is very dangerous.”

“I put her down two days ago,” said the older monk. “Why are you still carrying her?”

Advertisements

विनोद

एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.

हत्ती-तु झाडावर कय करतोयस?

गाढव- सपरचन्द खायला आलोय.

हत्ती- आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.

गाढव- मी सफरचन्द सोबत घेउन आलोय

विनोद: पोपट – व्यवस्थापन

एकदा गंपू पोपट विकत घ्यायला पोपटविक्याकडं जातो. तिथं साधारणपणे एकसारखे दिसणारे तीन पोपट असतात.

“या डावीकडच्याची किंमत ५०० रुपये.” पोपट विक्या.

“का रे बाबा? इतकी का?” गंपू

“कारण त्याला ना संगणक चालवता येतो”

“आणि या उजवीकडच्याची?”

“१०००!, याला एका पोपटाला जे यायचं ते सारं येतंच, शिवाय याला ‘युनिक्स’ असलेले संगणकही हाताळता येतात.” पोपटविक्या.

आता गंपू तिसऱ्याची किंमत विचारणार हे ओळखून पोपटविक्या आधीच म्हणाला “या मधल्याची किंमत मात्र २५०० रुपये बरं का?”

“असं का? काय काय येतं याला?” अर्थातच गंपू.

“खरं तर मी याला कधीच, काहीही करताना पाहिलं नाही आहे. पण बाकीचे दोघे याला ‘साहेब’ म्हणतात.”

आत-बाहेर

श्री आंत एकदा श्री बाहेर यांना भेटायला गेले. बाहेर उभे राहून आंत यांनी बाहेर यांना बाहेर बोलावले. पण आंत बसलेल्या बाहेर यांनी आंत यांना आंत बोलावले. जेंव्हा आंत आंत आले, तेंव्हा आंत यांना बाहेर बघण्यासाठी बाहेर गेलेल्या बाहेर यांनी आंत यांना बाहेर बोलावले. पण आंत असलेल्या आंत यांनी बाहेर यांना आंत बोलावले. तेंव्हा बाहेरून आंत आलेल्या बाहेर यांची आंत असलेल्या आंत यांची भेट झाली. हुश्श्श… 🙂

एक सुभाषित

यौवनं धनसंपत्तिः प्रभूत्वमविवेकिता। एकैकप्यनर्थाय किमु अत्र चतुःष्टयम॥

अर्थः तारूण्य, श्रीमंती, अधिकार (प्रभूत्व) आणि असामंजस्य यातील एक गोष्टही (?) अधःपतनास (अनर्थास) कारणिभूत होते तर चारही एकत्र असतील तर काय होइल?

Quote for the day

I’d never join a club that would allow a person like me to become a member

विनोद

एकदा जिजाबाई आणि शिवाजी महाराज पत्ते खेळत बसलेले असतात…
तेंव्हा जिजाबाई म्हणतात, “शिवबा, तो बघ, तो खिडकीतून दिसणारा किल्ला आमच्या मनात घर करून राहिला आहे, तो घेऊन ये”
आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून शिवाजी महाराज लगेच घोड्यावर मांड टाकून जातात.
१५-२० मिनिटांनी परत येऊन म्हणतात, “मांसाहेब तो किल्ला आपलाच होता”.
जिजाबाई म्हणतात, “मला माहित होते, पण मला तुझे पत्ते बघायचे होते”
परत एकदा जिजाबाई आणि शिवाजी महाराज पत्ते खेळत बसलेले असतात…
खिडकीतून एक किल्ला दिसतो… पण ह्या वेळेला जिजाबाई काहीच म्हणत नाहीत…आणि तो किल्ला त्यांच्या मनात घर ही करत नाही
एकदम अचानक कसला तरी मोठा आवाज येतो…
त्याबरोबर शिवाजी महाराज म्हणतात, “कोण आहे रे तिकडे”.
आवाज ऐकून जवळचा एक शिपाई तेथे येतो आणि म्हणतो, “हुकूम महाराज”.
शिवाजी म्हणतो, “इस्पिक”

पी.जे.

चाळीतल्या एका कडे पाहुणे म्हणुन आलेल्या आजोबांनी शेजारच्या
जोशी काकुंच्या बंड्याला विचारले.
“काय रे बंडु, तुझे बाबा काय काम करतात?”
त्यावर बंडु न गोंधळता उत्तरला,
” आई सांगेल ते सगळे !!!”

Food for thought

Nothing is enough for a person for whom enough is too little

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑