सहज सुचलं म्हणून… कृष्ण आणि कृष्णावतार (नमो) !

​माझी आजी महाभारतातल्या गोष्टी सांगायची... त्यातली एक कृष्ण-सत्यभामा यांची होती. कृष्णाला रुक्मिणी आणि सत्यभामा अशा दोन बायका होत्या. तशा १६,००० होत्या म्हणे, पण त्यातल्या प्रमुख ह्या दोन.होत्या. रुक्मिणी प्रेमळ आणि समंजस (थोडक्यात "आदर्श" बायकोसारखी  ) होती. तर सत्यभामा प्रेमळ पण खाष्ट, चीडचीड करणारी, भांडकुदळ, संशयी, मत्सरी अशी होती (थोडक्यात "खऱ्या" बायकोसारखी  ) मी लहानपणी वाचलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये राजांना दोन बायका असायच्या - एक आवडती आणि एक नावडती. हल्ली महागाई इतकी वाढली आहे की २ बायका परवडणे अवघड आहे. म्हणून त्यांना एकच बायको असते - नावडती हे विषयांतर झाले. असो. तर कृष्ण आणि सत्यभामा यांचे सतत भांडण व्हायचे. सत्यभामा आणि रुक्मिणी यांची घरं शेजारी-शेजारी च होती. आणि सत्यभामाला तिच्या संशयी स्वभावाप्रमाणे कृष्ण रुक्मिणीवर जास्त प्रेम करतो, जास्त वेळ देतो... असं वाटायचं. हे आपल्याकडे कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी अतिशय काव्यात्म आणि समर्पक रितीने एका गीतात मांडले आहे. सत्यभामा कृष्णाला विचारते: "बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी". पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. ह्यात पारिजातकाचे झाड हे प्रेमाचे रूपक म्हणून वापरले आहे. संपूर्ण गीत हे असे आहे: ======================== बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणी जन तिजसी म्हणती दुःख हे भरल्या संसारी। असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे? कपट का करिती चक्रधारी। का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी। ... फुले का पडती शेजारी।। ======================== म्हणजे कृष्ण पण असा चतुर आणि खोडकर होता की त्याने झाड लावले सत्यभामेच्या अंगणात पण ते अशा प्रकारे लावले की त्यातूनही तिची चीडचीड आणि जळजळच होईल! हे परत विषयांतर झाले. असो. तर सत्यभामा त्यामुळे सारखी चिंताग्रस्त असायची, कि कृष्णाचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे का नाही. म्हणून तिने कृष्णाला विचारले: "मी तुम्हाला किती प्रिय आहे?" ती आत्ताच्या काळात असती तर "On scale of 1 to 10, 1 being 'I don't hate you' and 10 being 'I am totally into you', how much do you love me?" असा पॉईंटेड प्रश्न विचारला असता. पण असा ओपन एंडेड प्रश्न विचारल्यामुळे पुन्हा कृष्णाला खोडकरपणा करायची संधी मिळाली. कृष्ण म्हणाला: तू मला मिठाइतकी प्रिय आहेस! सत्यभामा म्हणाली:... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑