Indian Idol आणि आठवणींचा पाऊस…

काल आणि परवा घरी Indian Idol बघत होतो. मी एकटाच...कारण बाकीच्यांना तितकासा interest नव्हता. नेमके चांगले गाणे चालू असताना फोन, एकमेकांच्यात गप्पा, बडबड यामुळे माझी चिडचिड झाली आणि मी तसे बोलून दाखवल्यावर साहजिकच थोडे भांडण, उत्तराला प्रत्युत्तर झाले.  त्यानंतर सगळे शांत...आणि मी एकटाच TV समोर बसून उर्वरीत कार्यक्रम बघत होतो. तेव्हा अचानक मला दोन व्यक्तींची तीव्र... Continue Reading →

वैकुंठ — तुका म्हणे रक्षा झाली आपोआप

वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग एका बोर्डवर लिहीला आहे. अतिशय कळकट्ट अवस्थेतल्या त्या बोर्डकडे कुणाचे लक्षही जात नसेल. पण मला मात्र तो बोर्ड वाचून फार नवल वाटले. तुकारामांनी किती विविध विषयांवर अभंग रचले आहेत, विचार केला आहे. आणि किती कमी शब्दात गहन अर्थ मांडला आहे. अगदी मृत्यू आणि अंतिम विधी यांवर... Continue Reading →

“दुर्दैवी” मुकुंद फणसळकर, श्रद्धांजली आणि Good Will Hunting

परवा मी सुप्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर याच्या श्रद्धांजली निमित्त आयोजित कार्यक्रम "मुकुंद...एक नॅास्टॅल्जिया" या कार्यक्रमाला गेलो होतो. त्याबद्दल काही लिहावेसे वाटले. मी १९९५ मध्ये दहावी/अकरावी मध्ये असताना झी टीव्हीवर सारेगामा पहायचो. सोनू निगम ॲंकर होता आणि अनेक दिग्गज judges होते. स्पर्धकही दर्जेदार होते. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान ह्या अशाच reality shows मधून पुढे आल्या. त्यातलाच... Continue Reading →

तू माझ्या आयुष्याची पहाट…

श्रीधर फडके चे "तू माझ्या आयुष्याची पहाट" ऐकताना आणि जुन्या इमेल वाचताना ही पोस्ट करावीशी वाटली. गहिवरून येणे, रडावेसे वाटणे, हळवे होणे या गोष्टी सध्या अचानकच घडतात. प्रत्यक्ष रडणे हे कृती म्हणून वेगळे आणि भावनांचा कडेलोट म्हणून तसे वाटणे हे वेगळे. हल्ली मधेच अपरात्री, पहाटे जाग येते. मग बाबांच्या आठवणी... मग कोणाशी तरी बोलावंसं वाटतं...... Continue Reading →

तत्वज्ञान आणि दुःख

गेल्या काही वर्षात मी दोन विषयांचा जास्त सखोल अभ्यास केला आहे, किंवा त्या विषयांची आवड निर्माण झाली आहे - एक फायनान्स/अर्थशास्त्र आणि दुसरा तत्वज्ञान. तत्वज्ञान या विषयाची आवड मला अगदी लहानपणापासून आहे. आणि त्याबद्दल बऱ्यापैकी वाचन केले आहे...सुरुवातीची काही वर्षे मराठीत आणि नंतर इंग्रजीत. त्यातून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे तत्वज्ञान आणि दुःख याचे खूप जवळचे... Continue Reading →

बाबा…

एकदा मला माझ्या मित्राने विचारलेः "तुला तुझा sense of humour कोणाकडून मिळाला?" मी म्हणालोः "बहुतेक आईकडून मिळाला असणार...कारण बाबांचा sense of humour त्यांच्याकडेच आहे" आता विनोद म्हणूनही मी असं म्हणू शकणार नाही...😌😔

डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या स्मृतिविषयी

डॉ. शंतनू अभ्यंकर हे वाई मधील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि एक विवेकवादी विचारवंत आणि लेखक होते. नुकतेच त्यांचे 15ऑगस्ट 2024 ला कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मुलाखतीचा एक ब्लॉग मी इथे पूर्वी लिहिला होता. 1-2 वर्षांपूर्वी ते कर्करोगातून बरे झाले होते, त्यावेळी त्यांनी "आपुले मरण पाहिले म्या डोळा" नावाचा लेख लिहिला होता. त्यांची लिहायची, बोलायची शैली साधी... Continue Reading →

निरर्थक पाठांतर, संस्कृत आणि कालिदास

नुकतेच Twitter वर ​एक tweet वाचले आणि हे लिहायचे ठरवले.  "तुम्ही पाठ केलेली किंवा तुमच्या स्मरणात असलेली सगळ्यात निरर्थक गोष्ट कोणती?" असा प्रश्न होता. त्यावर एकानी "पठ" चं संस्कृत शब्द रूप (म्हणजे शब्द चालविणे) याचं उदाहरण दिलं आणि त्यावरून माझ्या मनात बरेच विचार आले. कारण त्याबद्दल मीदेखील अनेकदा विचार करतो. कित्येक गोष्टी माझ्या स्मरणात आहेत ज्या म्हटलं... Continue Reading →

Nostalgia, उतारवय आणि आमचे शिक्षक

You become old when your memories are stronger than your dreams. When you spend more time in nostalgia. माझे आणि माझ्या शाळेचे नाते हे कडू-गोड आहे. काय ती थोर शाळा, काय ते शिक्षक, काय ते दिवस...असं वाटून उगाच हुंदका येणाऱ्यातला मी नाही. तरीही जेव्हा मी अचानक हा व्हिडीओ Youtube वर पाहिला तेव्हा तो पूर्ण पाहण्याचा... Continue Reading →

सहज सुचलेलं…

नवीन वर्षांत तारीख लिहीताना जुनेच वर्षं लिहीले असे तुमच्या बाबतीत होते का? होत असेल तर किती दिवस? माझे खूप पूर्वी व्हायचे तसे. पण हल्ली गेली ८-९ वर्षे अजिबात होत नाही. गतवर्षांत रेंगाळण्यासारखं हल्ली काहीच घडत नाही. त्यामुळे असेल कदाचित…

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑