डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या स्मृतिविषयी

डॉ. शंतनू अभ्यंकर हे वाई मधील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि एक विवेकवादी विचारवंत आणि लेखक होते. नुकतेच त्यांचे 15ऑगस्ट 2024 ला कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मुलाखतीचा एक ब्लॉग मी इथे पूर्वी लिहिला होता. 1-2 वर्षांपूर्वी ते कर्करोगातून बरे झाले होते, त्यावेळी त्यांनी "आपुले मरण पाहिले म्या डोळा" नावाचा लेख लिहिला होता. त्यांची लिहायची, बोलायची शैली साधी... Continue Reading →

१५ अॅागस्ट

१५ अॅागस्ट हा दिवस माझ्यासाठी एक खास आठवणीतला दिवस होता. त्याचा संबंध स्वातंत्र्यदिन किंवा देशप्रेम यांच्याशी नव्हता तर एका वैयक्तिक आठवणीशी, व्यक्तीशी, नात्याशी होता. आजचा १५ अॅागस्ट हा एका नव्या कारणासाठी महत्वपूर्ण आहे. एका नव्या सुरूवातीसाठी, एका नव्या शक्यतेसाठी. Bucket List मधला (अजून) एक item पूर्ण झाला! आता अजून एक खूप वर्षांपासून मनात योजलेली गोष्ट... Continue Reading →

निरर्थक पाठांतर, संस्कृत आणि कालिदास

नुकतेच Twitter वर ​एक tweet वाचले आणि हे लिहायचे ठरवले.  "तुम्ही पाठ केलेली किंवा तुमच्या स्मरणात असलेली सगळ्यात निरर्थक गोष्ट कोणती?" असा प्रश्न होता. त्यावर एकानी "पठ" चं संस्कृत शब्द रूप (म्हणजे शब्द चालविणे) याचं उदाहरण दिलं आणि त्यावरून माझ्या मनात बरेच विचार आले. कारण त्याबद्दल मीदेखील अनेकदा विचार करतो. कित्येक गोष्टी माझ्या स्मरणात आहेत ज्या म्हटलं... Continue Reading →

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत!

पु. ल. देशपांडे यांचा कमी प्रचलित असणारा लेख सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये. आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा... Continue Reading →

कुमार गंधर्व @ १००

काल, म्हणजे ८ एप्रिल २०२४ हा दिवस म्हणजे कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी होती. सध्या निवडणूकांची धामधूम असल्यामुळे शासन, माध्यमे यांना त्याचा विसर पडला असावा. लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात एक लेख होता, पण बाकी विशेष काही नाही. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर हे शास्त्रीय संगीतातील माझ्या आवडीचे गायक कलाकार आहेत, पं. अभिषेकी, वसंतराव देशपांडे हे देखील... Continue Reading →

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद।प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ॥ ॥ब्रह्मध्वजाय नम:॥ हिंदूनुतनवर्षाभिनंदन !चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४६ क्रोधीनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा !! आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

‘निवडणुकांचे लोकशाहीकरण’ – एक परिसंवाद

 भारताच्या राजकारणात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व अशी उलथापालथ चालली आहे. तुम्ही संघोटे असाल तर तुम्हाला तसं वाटणार नाही. पण मी सुज्ञ आणि विचारी लोकांबद्दल बोलतोय.  राजकारण गढूळ झालंय आणि त्यात २-३ ठळक मुद्दे आहेत. पहिला: भारताचे संविधान, घटना, भारताचे निधर्मी प्रजासत्ताक हे अस्तित्व धोक्यात आहे. दुसरा सध्याच्या संघी हुकूमशाहाकडून सर्वोच्च न्यायालय आणि एकूणच न्याय... Continue Reading →

मृत्यच्या दाढेतून परत येणं म्हणजे हेच का?

दाढेत भरलेलं सिमेंट निघाल होतं म्हणून तो व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या क्लिनिकमधे गेला. त्याला पाहून ती खट्याळपणे म्हणाली, "आज बऱ्याच दिवसांनी मैत्रिणीची आठवण आली म्हणायची!" तो शांतपणे म्हणाला, "ते पूर्वीचे फिलिंग आता राहिले नाही" मृत्यच्या दाढेतून परत येणं म्हणजे हेच का? 😀😀😀😀😀😀😀😀

जीवन चक्र

एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे. शाळेत असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो. चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो. 😇

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑