तात्पर्य…

एक ब्रिटीश डास मला चावला...मी त्याला म्हणालो, ’चले जाव’, तो नाही गेला, मी त्याच्या पाठीत धपाटा मारला, तो मेला. (आधी गेला असतास तर काय मेला असता! - मी)तात्पर्य १: गुजराती माणसाचे हिंदी ब्रिटीशांना समजते, पण मराठी माणसाचे हिंदी त्यांना नाही समजत.तात्पर्य २: कधी कधी हिंसा हा सुद्धा योग्य मार्ग असू शकतो.~ कौस्तुभ

पद्मश्री सैफ अली खान

दरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो...पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.मी खूप आधीपासून पद्म... Continue Reading →

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे - नक्की कोणत्या वर्षीची आहेत ते माहिती नाही.माधुरी दीक्षित आणि यांची तुलना, साम्य (ती आणि मधुबाला एका काळात असत्या तर कोण जास्त लोकप्रिय झाले असते ई.) ह्यावर अनेक लेख आणि चर्चा झाल्या आहेत किंवा होत रहातील.पण माझ्या मते  -१) अशी चर्चा करता येणे शक्य नाही - कारण काळानुसार कोणाचे करीअर कसे घडले... Continue Reading →

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

काळानुसार सण, चालीरिती, प्रथा बदलाव्यात, नाही?त्यामुळे सध्याच्या काळाला अनुसरुन मी हा संदेश बदलला आहे - विषेशतः मुलींसाठी! :)तिळगूळ घ्या...कमी बोला!!!~ कौस्तुभ

पी.जे.

पी.जे.अर्नोल्ड आणि अलक कुबल यांनी एका चित्रपटात एकत्र काम केले तर त्याचे नाव काय असेल?- माहेरचा टर्मिनेटरएकदा सगळे प्राणी आषाढी एकादशीला वारीला चालत जातात. पण फक्त कोंबडी टॆक्सी घेऊन जाते. का?- कारण आषाढी एकादशीला कोंबडी चालत नाही.संटा: मेरे पास आज गाडी है, बंगला है...तुम्हारे पास क्या है?बंटा: मेरे पास भी गाडी है, बंगला है.संटा: ओये... Continue Reading →

वटवट वटवट…

वटवट वटवट...मी आधी म्हटल्याप्रमाणे पुलंचे वटवट वटवट हा बहुरंगी-बहुढंगी कार्यक्रम माझ्या पॊडकास्ट वर अपलोड केला आहे...   Vatvat Vatvat by Pu La Deshpande   Kaustubh's podcast  Part2:   Vatvat Vatvat - Part 2 by Pu La Deshpande   Kaustubh's podcast  Part3:   Vatvat Vatvat - Part 3 by Pu La Deshpande   Kaustubh's podcast  Part4:   Vatvat Vatvat - Part 4 by Pu La Deshpande  ... Continue Reading →

असेच काही तरी…

’स्थळा’साठी फोन केलेली एक बाई (म्हणजे मुलीची आई) सारखी ’आत्ताचा फोटो पाठवा...पण...अलिकडचा फोटो पाठवा बरं का...शक्यतो लेटेस्ट फोटो पाठवा’ म्हणत होती...त्यामुळे वैतागून मी ’लेटेस्ट’ फोटो पाठवला, (मूळ फोटो मुद्दाम दिला नाहीये...थोडा ’स्पेशल ईफेक्ट’ दिला आहे...)त्यावर त्यांचे आत्ताच उत्तर आले आहे - ’थोडा जुना फोटो पाठवला तरी चालेल’...चला...मी माझ्या बारश्याचा फोटो scan करायला जातो :)~ कौस्तुभ

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑