ताजी ताजी ग्राफिटी... (सचिनच्या सौजन्याने)~ कौस्तुभ
ह्यावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत
नुकतीच सा रे ग म प ची मेगाफायनल झाली - ह्या वेळच्या पर्वाबाबत निर्णयाची उत्सुकता मला कमी होती...कारण सगळेच professional singers होते. ह्या वेळच्या पर्वाचे मुख्य आकर्षण हे स्पर्धक नसून परिक्षक होते...पण एकूणच त्यांचे ’विवेचन’ आणि ’प्रवचन’ आणि सल्ले ऐकल्यावर त्यापेक्षा देवकी पंडीत बरी असे वाटायला लागले...गाण्यापेक्षा सुरेश वाडकर आणि ह्रुदयनाथ मंगेशकर यांचा mutual admiration... Continue Reading →
जीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा
आयुर्वेद आणि माझे तसे फारसे सख्य नाही...म्हणजे मला त्याबद्दल वाट्टेल ते ’claim’ करणारे लोक आवडत नाही...आणि विनाकारण इतर उपचार पद्धती वर टीका करणेही आवडत नाही...पण आपल्या so-called भारतीय संस्क्रुती मधलाच हा दोष असावा... अहंमन्यतेनी पछाडले असण्याचा. मग ते हिंदू धर्माच्या बाबतीत असो, किंवा हिंदु संस्क्रुती/ पुराण असो, रामदेव बाबांचे ’योग’ आणि ’प्राणायाम’ असो की, हिंदू... Continue Reading →
विनोद
एकदा एक मुंगी स्कूटर वरून जात असताना एकदम खाली पडते. का?- कारण स्कूटर संपते-----------------------------------------------------------------एका माणसाला ४ बहिणी असतात. तर त्याच्या मुलाचे नाव काय असेल?- आत्याचार-----------------------------------------------------------------भगवान शंकरानी जर त्यांचे आत्मचरित्र लिहायचे ठरवले तर त्या आत्मचरित्राचे नाव काय असेल?- कैलास जीवन!-----------------------------------------------------------------एक मराठी माणूस आपल्या आईच्या आज्जीच्या नावने bank सुरु करतो...तर त्याचे नाव काय असेल?- आय ची आय... Continue Reading →
एक कूटप्रश्न (puzzle)
तुमच्या जवळ ३००० केळी आणि ५ हत्ती आहेत. ती तुम्हाला पुण्याहून दिल्लीपर्यंत (१००० कि.मी धरा) न्यायची आहेत. पण -१. एक हत्ती जास्त्तीत जास्त १००० केळी नेऊ शकतो.२. प्रत्येक कि.मी. नंतर एका हत्तीला एक केळे लागते. नाहीतर तो पुढे जाणार नाही.३. हत्तीला तुम्ही वाटेतच सोडू शकता.सांगा पाहू तुम्ही जास्त्तीत जास्त किती केळी दिल्ली पर्यंत न्याल ?~ कौस्तुभ
Gym आणि फ्यामिली डॊक्टर
नुकतेच आमच्या Gym मध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले (मी मराठी माध्यमाचा असल्यामुळे मी आधी ’व्यायाम शाळा’ असे म्हणायचो. ते ऐकून लोक नाकं मुरडायचे. ’Gym’ कसं त्यांना ’sophisticated’ वाटते. म्हणजे जागा तीच. फक्त नाव बदललं की एकदम त्याचा ’क्लास’ बदलतो. असो.)आधी लेडीज Gym च्या वेळा (Gym च्या वेळा ...काय रचना आहे... ’गाड्यांना खूप गर्द्या होत्या’ सारखे) वेगळ्या होत्या... Continue Reading →
दिवस फार कठीण आहेत…
नुकतेच आमच्या एका प्रोजेक्ट मीटिंग मध्ये मी माझ्या manager ला सांगितले: ’माझ्या टीम मधला एक जण resign करणार आहे अशी कुणकुण मला लागली आहे’ (अर्थात हे मी इंग्लिश मध्ये सांगितले - आत इंग्लिशमध्ये मी ’कुणकुण लागली आहे’ हे कसे म्हटले असले प्रश्न विचारु नका. भावना लक्षात घ्या! तर कुठे होतो मी - हा, कुणकुण लागली...)तर... Continue Reading →
असेच काही तरी: नवीन जोक-बुक
परवा एका मित्राकडे गेलो होतो तेव्हा त्याने ’जोक-बुक’ चा नवीन अंक दाखवला. जोक बुक म्हणजे एका प्रसिद्ध ’विवाह-मंडळाचा’ मासिक अंक. आम्ही त्याला ’जोक-बुक’ म्हणतो.हसून हसून गडाबडा लोळावे असे ’नमुने’ असतात त्यात. काहींचे तर पान भर फोटो पण असतात, कट्रिना किंवा ह्रितिक ला लाजवतील असे मोडेलिंग करत... (बहुतेक फोटो ’जय बजरंग फोटो स्टुडिओ’ वगैरे ठिकाणी काढलेले... Continue Reading →
सा रे ग म प – लिटिल च्याम्प आणि एक आयडिया
आज ’सा रे ग म प’ ची मेगा-फाईनल...सगळ्या मराठी लोकांचे डोळे त्याच्या निकालाकडे लागले आहेत...सध्या आमच्याकडचे वातावरण ’सा रे ग म प’ मय झाले आहे...सगळे जण संगीतातले दर्दी असल्या सारखे सारेगम ची भाषा वापरतात...फक्त कार्यक्रमाच्या बाबतीतच असे नाही तर एकुणच...म्हणजे आई माझ्यावर चिडली की पूर्वी म्हणायची "कौस्तुभ, तुला धपाटा देइन बरं का..." आता म्हणते "कौस्तुभ... Continue Reading →
विनोद
एक सुंदर अभिनेत्री बोटीने लांबची समुद्रसफ़र करण्यास निघाली. तिने बोटीवर असताना लिहीलेल्या दैनंदिनीतील काही भाग -दि. ०७ ऒक्टोंबर - प्रवासास आरंभ झाला. बोटीत १५०० प्रवासी आहेत. डेकवर फिरताना जहाजाच्या कप्तानाशी ओळख झाली.दि. ०८ ऒक्टोंबर - आज मी आणि कप्तान डेकवर खूप वेळ एकत्र फिरलो. आम्ही खूप गप्पा मारल्या.दि. ०९ ऒक्टोंबर - कप्तानाशी दोस्ती खूपच वाढली.दि.... Continue Reading →

Recent Comments