आज वटपौर्णिमा. म्हणजे...वार्षिक, नैमित्तिक विनोद (पुन्हा) सांगायचा दिवस... प्रश्न: सात जन्म एकच नवरा मिळावा यासाठी जी प्रार्थना करते तिला वट-सावित्री म्हणतात तर, एका जन्मात सात नवरे मिळावेत यासाठी जी प्रार्थना करते तिला काय म्हणणार? उत्तर: चावट-सावित्री! 😂😂😂
पुणेरी मराठी
समोरच्या इसमाने अगदी न्यूटन च्या नियमाच्या तोडीचे जरी संशोधन आपल्याला सांगितले किंवा समोर मांडले तरी ते कस्पटासमान असून त्यात आपल्याला काडीमात्र रस नाही हे कमीत कमी शब्दात व्यक्त करून त्या इसमाचा जास्तीत जास्त अपमान करून त्याच्या उत्साहावर विरजण घालणारा पुणेरी शब्दसमूह म्हणजे - ............... "बरं मगं?"😂😂😂
मिशी असलेला पक्षी…
नुकताच मी ट्वीटरवर मिशी असलेल्या पक्षाचा फोटो पाहिला. कोणाला त्याबद्दल माहिती आहे का?
मराठी वेब सिरीज: “भाडीपा” चा “कास्टिंग काऊच”
वेब सिरीज हा प्रकार तसा नवा आहे, पण क्रिएटिव्ह लोकांसाठी तो खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे... म्हणजे ज्यांना स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊस, टीआरपी वगैरे बंधनामुळे ज्या गोष्टी, जे प्रयोग टीव्ही वर करता येत नाहीत ते वेब सिरीज मध्ये करता येतात. ऍमेझॉन, नेटफ्लिक्स हे आता खूप मोठ्या स्केलवर एक्सक्लुसिव वेब कन्टेन्ट मोठ्या प्रमाणावर बनवायला लागले आहेत. आपल्याकडे AIB... Continue Reading →
लपून पाणी पिणारा जगातील एकमेव पक्षी
लपून पाणी पिणारा हा जगातील एकमेव पक्षी असून पाणी पिताना याला कोणीही पाहू शकत नाही. या पक्षाची किंमत जवळपास 25 लाख रुपये आहे.19 फोटोग्राफर्सनी 62 दिवस सतत प्रयत्न करून हा लहानसा व्हिडीओ बनवलाय...व्हिडीओ बघा👇 #WhatsApp #Forward Additional info shared by a friend: I have seen this before on Animal Planet. The bird is surely not... Continue Reading →
I told you so…first! :-)
Few months back, on 8th January 2018 to be precise, I wrote a blog on Anuja Kamat's Youtube Channel for Indian Classical Music Enthusiasts It was good to read today a detailed story on this in Scroll.in A young YouTuber is teaching thousands of Indians how to listen to classical music I can now claim... Continue Reading →
चहा स्तोत्र…
कॉफी मुक्त होण्यासाठी कॉफीच्या आधीन गेलेल्या (म्हणजे वाट चुकलेल्या) लोकांनी हे स्तोत्र रोज ३ वेळा म्हणून नंतर चहा-तीर्थ घेतल्यास १ महिन्यात ते बरे होतात आणि योग्य मार्गाला लागतात 🙂 https://soundcloud.com/user-981722748/chaha-stotra/s-HqBkm
सहज सुचलं म्हणून… कृष्ण आणि कृष्णावतार (नमो) !
माझी आजी महाभारतातल्या गोष्टी सांगायची... त्यातली एक कृष्ण-सत्यभामा यांची होती. कृष्णाला रुक्मिणी आणि सत्यभामा अशा दोन बायका होत्या. तशा १६,००० होत्या म्हणे, पण त्यातल्या प्रमुख ह्या दोन.होत्या. रुक्मिणी प्रेमळ आणि समंजस (थोडक्यात "आदर्श" बायकोसारखी ) होती. तर सत्यभामा प्रेमळ पण खाष्ट, चीडचीड करणारी, भांडकुदळ, संशयी, मत्सरी अशी होती (थोडक्यात "खऱ्या" बायकोसारखी ) मी लहानपणी वाचलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये राजांना दोन बायका असायच्या - एक आवडती आणि एक नावडती. हल्ली महागाई इतकी वाढली आहे की २ बायका परवडणे अवघड आहे. म्हणून त्यांना एकच बायको असते - नावडती हे विषयांतर झाले. असो. तर कृष्ण आणि सत्यभामा यांचे सतत भांडण व्हायचे. सत्यभामा आणि रुक्मिणी यांची घरं शेजारी-शेजारी च होती. आणि सत्यभामाला तिच्या संशयी स्वभावाप्रमाणे कृष्ण रुक्मिणीवर जास्त प्रेम करतो, जास्त वेळ देतो... असं वाटायचं. हे आपल्याकडे कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी अतिशय काव्यात्म आणि समर्पक रितीने एका गीतात मांडले आहे. सत्यभामा कृष्णाला विचारते: "बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी". पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. ह्यात पारिजातकाचे झाड हे प्रेमाचे रूपक म्हणून वापरले आहे. संपूर्ण गीत हे असे आहे: ======================== बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणी जन तिजसी म्हणती दुःख हे भरल्या संसारी। असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे? कपट का करिती चक्रधारी। का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी। ... फुले का पडती शेजारी।। ======================== म्हणजे कृष्ण पण असा चतुर आणि खोडकर होता की त्याने झाड लावले सत्यभामेच्या अंगणात पण ते अशा प्रकारे लावले की त्यातूनही तिची चीडचीड आणि जळजळच होईल! हे परत विषयांतर झाले. असो. तर सत्यभामा त्यामुळे सारखी चिंताग्रस्त असायची, कि कृष्णाचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे का नाही. म्हणून तिने कृष्णाला विचारले: "मी तुम्हाला किती प्रिय आहे?" ती आत्ताच्या काळात असती तर "On scale of 1 to 10, 1 being 'I don't hate you' and 10 being 'I am totally into you', how much do you love me?" असा पॉईंटेड प्रश्न विचारला असता. पण असा ओपन एंडेड प्रश्न विचारल्यामुळे पुन्हा कृष्णाला खोडकरपणा करायची संधी मिळाली. कृष्ण म्हणाला: तू मला मिठाइतकी प्रिय आहेस! सत्यभामा म्हणाली:... Continue Reading →
स्वयं Talks – Youtube Channel
मला TED Talks ऐकायला आवडते. अर्थात खूप कमी Talks खरंच दर्जेदार असतात. बरेचदा Talks सुमार किंवा यथातथा असतात. पण एक उपक्रम म्हणून TED Talks किंवा Google Talks ही खूप चांगली कल्पना आहे. उगाचच भव्य-दिव्य किंवा जीवनरहस्य सांगायचा आव न आणता साधे पण प्रभावी वक्ते आणि त्यांच्याशी गप्पा अशा प्रकारचे कार्यक्रम मला चांगले वाटतात. मराठीत असं काही का... Continue Reading →

Recent Comments