नवस…

लोकं देवाला नवस बोलतात - की अमुक झाले तर तुला तमुक अर्पण करीन, दान करीन, देईन...मग देव त्यांच्या (सगळ्यांच्या नाही, काही पुण्यवान लोकांच्या) ईच्छा पूर्ण करतो. आणि लोकं देवाला बोललेला नवस फेडतात.मी मला स्वतःलाच नवस बोलतो. उदा. कौस्तुभ...तु हे केलेस तर मी तुला घेईन, किंवा तु ते केले नाहीस तर मी तुला ते देइन. त्यामुळे... Continue Reading →

राजश्री मराठी डॊट कॊम

राजश्री फिल्म्स या चित्रपट निर्मिती, वितरण करणाऱ्या कंपनीकडे अनेक चित्रपट, मालिका इ. चे वितरणाचे हक्क आहेत. केवळ हिंदीच नाही तर इतर भाषेतल्या कलाक्रुतींचे सुद्धा...नुकतीच मी त्यांची वेबसाईट - राजश्री मराठी डॊट कॊम पाहिली आणि त्याचीच लिंक इथे शेअर करत आहे...www.rajshrimarathi.comइथे तुम्हाला अनेक मराठी चित्रपट, मालिका इ. च्या चित्रफिती (संपूर्ण किंवा संक्षिप्त) पाहता येतील - तेदेखील... Continue Reading →

तात्पर्य…

एक ब्रिटीश डास मला चावला...मी त्याला म्हणालो, ’चले जाव’, तो नाही गेला, मी त्याच्या पाठीत धपाटा मारला, तो मेला. (आधी गेला असतास तर काय मेला असता! - मी)तात्पर्य १: गुजराती माणसाचे हिंदी ब्रिटीशांना समजते, पण मराठी माणसाचे हिंदी त्यांना नाही समजत.तात्पर्य २: कधी कधी हिंसा हा सुद्धा योग्य मार्ग असू शकतो.~ कौस्तुभ

साहित्य संमेलन – मला दिसले तसे…

¶मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आलो तेव्हापासूनच त्याबद्दल लिहायचे होते, लिहायला सुरुवातही केली होती पण काही ना काही कारणामुळे पूर्ण करणे राहून गेले होते...¶पुण्यात जे काही होते ते अखिल भारतीयच असते. आमच्या घराजवळ ’अखिल भारतीय शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळ’ आहे (त्या नवरात्र मंडळाचा गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा... Continue Reading →

वास्तुशास्त्र

सध्या लोकसत्ताच्या वस्तुरंग या पुरवणीत संजय पाटील यांची एक लेखमाला प्रसिद्ध होते. त्याचा विषय ’वास्तुशास्त्र’ हा आहे. मला मुळातच ह्या विषयचा तिटकारा आहे - तो त्यातल्या "शास्त्र" ह्या शब्दामुळे.माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातच हे ’वास्तुशात्र’ चे प्रस्थ माजले आहे, नाही, पद्धतशीरपणे ते माजवले आहे...आणि आपल्याकडची बिनडोक, पापभीरु आणि झटपट सुख मिळवण्याच्या मागे लागलेली आणि कायम... Continue Reading →

॥ श्री रामरक्षा ॥

माझी रामरक्षा लहानपणापासूनच पाठ आहे...घरातल्या वडिलधारी मंडळींकडून सतत कानावर पडून पडून आपोआपच पाठ झाली, कधी वेगळे पाठांतर करावेच लागले नाही.लहानपणी केलेल्या पाठांतराचे हे एक वैशिष्ट्य आहे...नकळतच पाठ होते आणि कायमचे लक्षात राहाते (आता काही पाठ करायचे/ नवीन शिकायचे म्हणजे फार मेहेनत करावी लागते)पण तसेच त्यात एक धोका किंवा दोष पण आहे... तेव्हा जे चुकिचे किंवा सदोष/ अशुद्ध पाठांतर होते ते पण सुधारणे जड जाते. कारण तेव्हा अर्थ वगैरे काही माहितीच नसतो...नुसते कानावर पडते म्हणून लक्षात राहते.माझे रामरक्षेबाबत तसेच काहीसे झाले आहे. काही जे चुकिचे किंवा अशुद्ध पाठ झाले आहे ते आता मला समजून सुद्धा दुरुस्त करता येत नाही.म्हणूनच मी रामरक्षा सॉफ्ट कॉपी स्वरूपात शोधत होतो, म्हणजे सतत वाचून काही चुक दुरुस्त करता आली तर बघावे!सुदैवाने मला नुकतीच ती सॉफ्ट कॉपी मिळाली (अर्थासकट!)...तुम्ही ती इथे डाऊनलोड करू शकता.लवकरच रामनवमी आहे, तोपर्यंत जर जमले तर चुका सुधारायचा प्रयत्न आहे... बघु जमते का तेता. क. - मी रामरक्षा एम पी ३ इथे अपलोड केली आहे...आणि त्याचबरोबर 'मुदाकरात' हे गणपती स्तोत्र (एम पी ३) पण अपलोड केले आहे...~ कौस्तुभ

नवीन डोमेन आणि गेस्ट ब्लॊग

नवीन डोमेन सेट अप केल्यावरचा हा माझा पहिलाच  ब्लॊग पोस्ट. अजून बऱ्याच लोकांना हा नवीन ब्लॊग माहितीच नाहिये (जणू काही जुन्या ब्लॊगला हजारो लोक भेट द्यायचे...असो)तर आता मी माझे मराठी आणि इंग्लिश ब्लॊग एकत्र केले आहेत. त्याच बरोबर एक ’गेस्ट ब्लॊग’ सुरु केला आहे. त्याबद्दलच मला थोडे लिहायचे आहे.माझ्या माहितीतले बरेच जण असे आहेत जे... Continue Reading →

पद्मश्री सैफ अली खान

दरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो...पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.मी खूप आधीपासून पद्म... Continue Reading →

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे - नक्की कोणत्या वर्षीची आहेत ते माहिती नाही.माधुरी दीक्षित आणि यांची तुलना, साम्य (ती आणि मधुबाला एका काळात असत्या तर कोण जास्त लोकप्रिय झाले असते ई.) ह्यावर अनेक लेख आणि चर्चा झाल्या आहेत किंवा होत रहातील.पण माझ्या मते  -१) अशी चर्चा करता येणे शक्य नाही - कारण काळानुसार कोणाचे करीअर कसे घडले... Continue Reading →

अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखत

अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखतत्यांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत अनेक क्लीष्ट गोष्टी छान समजावून सांगितले आहे! अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखतKaustubh's podcast~ कौस्तुभ

Blog at WordPress.com.

Up ↑