गेल्या काही वर्षात मी दोन विषयांचा जास्त सखोल अभ्यास केला आहे, किंवा त्या विषयांची आवड निर्माण झाली आहे - एक फायनान्स/अर्थशास्त्र आणि दुसरा तत्वज्ञान. तत्वज्ञान या विषयाची आवड मला अगदी लहानपणापासून आहे. आणि त्याबद्दल बऱ्यापैकी वाचन केले आहे...सुरुवातीची काही वर्षे मराठीत आणि नंतर इंग्रजीत. त्यातून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे तत्वज्ञान आणि दुःख याचे खूप जवळचे... Continue Reading →
“त्याच्यामध्येच मी शांत होते…” संवाद : प्रतिभा रानडे, दीपाली दातार
प्रतिभा रानडे. वय 88. अद्याप तल्लख मन असलेली मराठीमधील अत्यंत महत्वाची लेखिका. आणि या अशा 'प्रतिभेचा पैस' संवादाच्या रूपात नेटकेपणे पुस्तकबद्ध करणाऱ्या दीपाली दातार. या दोघींशी लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेला सहज संवाद म्हणजे बुक ब्रो एपिसोड 83 https://www.youtube.com/watch?v=EnLIHJ0DE9w
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अहंभावं त्यजेद्वेषं क्रोधं शोकं भयं व्यथाम् |धरेद्धैर्यं मनश्शक्तिं स्नेहं शान्तिं कृतज्ञताम् || Let one leave envy, anger, fear, ego, pain, hate & hold tight patience, courage, love, peace and gratitude!!! 🙏😊 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया…
गणपती बाप्पा मोरया... सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! मला स्वतःला गणपती उत्सव लाभत नाही असा माझा अनुभव आहे. अनेक वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशीच, किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे काही वाईट, त्रासदायक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आहेत, किंवा घडतात. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. त्याबद्दल लवकरच वेगळ्या ब्लॉग मध्ये लिहीन. पण असे असले तरी मला गणपती देवता,... Continue Reading →
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्।देहान्ते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर॥ हे परमेश्वरा, मला हे वरदान दे की माझा मृत्यू इतरांना कष्ट न देणारा (माझ्या चालत्या फिरत्या स्थितीत) व्हावा. माझं जीवन दयनीय नसावे व माझा मृत्यू तुझ्या सान्निध्यात येवो. — भीष्म (कृष्णाला) Oh Supreme Lord, let my death be without pain to the others (in my... Continue Reading →
डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या स्मृतिविषयी
डॉ. शंतनू अभ्यंकर हे वाई मधील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि एक विवेकवादी विचारवंत आणि लेखक होते. नुकतेच त्यांचे 15ऑगस्ट 2024 ला कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मुलाखतीचा एक ब्लॉग मी इथे पूर्वी लिहिला होता. 1-2 वर्षांपूर्वी ते कर्करोगातून बरे झाले होते, त्यावेळी त्यांनी "आपुले मरण पाहिले म्या डोळा" नावाचा लेख लिहिला होता. त्यांची लिहायची, बोलायची शैली साधी... Continue Reading →
निरर्थक पाठांतर, संस्कृत आणि कालिदास
नुकतेच Twitter वर एक tweet वाचले आणि हे लिहायचे ठरवले. "तुम्ही पाठ केलेली किंवा तुमच्या स्मरणात असलेली सगळ्यात निरर्थक गोष्ट कोणती?" असा प्रश्न होता. त्यावर एकानी "पठ" चं संस्कृत शब्द रूप (म्हणजे शब्द चालविणे) याचं उदाहरण दिलं आणि त्यावरून माझ्या मनात बरेच विचार आले. कारण त्याबद्दल मीदेखील अनेकदा विचार करतो. कित्येक गोष्टी माझ्या स्मरणात आहेत ज्या म्हटलं... Continue Reading →
दोन मराठी लघुचित्रपट (short films)
'शंभरावं स्थळ' and "Kande Pohe" - Two Marathi language short films
कुमार गंधर्व @ १००
काल, म्हणजे ८ एप्रिल २०२४ हा दिवस म्हणजे कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी होती. सध्या निवडणूकांची धामधूम असल्यामुळे शासन, माध्यमे यांना त्याचा विसर पडला असावा. लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात एक लेख होता, पण बाकी विशेष काही नाही. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर हे शास्त्रीय संगीतातील माझ्या आवडीचे गायक कलाकार आहेत, पं. अभिषेकी, वसंतराव देशपांडे हे देखील... Continue Reading →
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद।प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ॥ ॥ब्रह्मध्वजाय नम:॥ हिंदूनुतनवर्षाभिनंदन !चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४६ क्रोधीनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा !! आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Recent Comments