मीठ आणि अश्रू

कालच्या लोकसत्ता मध्ये "मीठ आणि अश्रू" नावाचा एक वाचनीय लेख प्रसिद्ध झाला. पोलंडमधील तेराव्या शतकात शोध लागलेली मिठाची प्रचंड खाण.. या खाणीची सफर करताना आलेले अनुभव, जाणवलेल्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत. अजून एक रंजक बाब म्हणजे इंग्रजीमधील Salary (वेतन) या शब्दाचे मूळ ह्या पोलंडमधील खाणीत आहे. आज जरी मीठ सहजी उपलब्ध असलं तरी त्याकाळी मीठ... Continue Reading →

Going “viral”

When I was a kid, "viral" referred to a type of infection/disease/health issue. Something caused due to a "virus". However, in last few years since the advent of Social Media, "viral" has a new meaning. Today, “going viral" refers to the sharing of something — often a video or a website link — via email or... Continue Reading →

नासाचे अंतराळयान आणि मराठी भाषा

नुकताच मी युनेस्को च्या अहवालानुसार जगातील विविध भाषांची क्रमवारी वाचत होतो...मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठीचा क्रमांक १६-१७ वा आहे, इटालियन, कोरीअन, पोलीश, डच, स्वीडीश अशा अनेक प्रादेशिक भाषांपेक्षाही वर.अजून एक interesting गोष्ट मला कळली, ती म्हणजे नासा नी व्हॊएजर नावचं एक यान अंतराळात सोडलं होतं. त्या यानाबरोबर विविध गोष्टी पाठवल्या होत्या - म्हणजे समजा कोणी परग्रहावर... Continue Reading →

साहित्य संमेलन – मला दिसले तसे…

¶मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आलो तेव्हापासूनच त्याबद्दल लिहायचे होते, लिहायला सुरुवातही केली होती पण काही ना काही कारणामुळे पूर्ण करणे राहून गेले होते...¶पुण्यात जे काही होते ते अखिल भारतीयच असते. आमच्या घराजवळ ’अखिल भारतीय शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळ’ आहे (त्या नवरात्र मंडळाचा गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा... Continue Reading →

वास्तुशास्त्र

सध्या लोकसत्ताच्या वस्तुरंग या पुरवणीत संजय पाटील यांची एक लेखमाला प्रसिद्ध होते. त्याचा विषय ’वास्तुशास्त्र’ हा आहे. मला मुळातच ह्या विषयचा तिटकारा आहे - तो त्यातल्या "शास्त्र" ह्या शब्दामुळे.माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातच हे ’वास्तुशात्र’ चे प्रस्थ माजले आहे, नाही, पद्धतशीरपणे ते माजवले आहे...आणि आपल्याकडची बिनडोक, पापभीरु आणि झटपट सुख मिळवण्याच्या मागे लागलेली आणि कायम... Continue Reading →

॥ श्री रामरक्षा ॥

माझी रामरक्षा लहानपणापासूनच पाठ आहे...घरातल्या वडिलधारी मंडळींकडून सतत कानावर पडून पडून आपोआपच पाठ झाली, कधी वेगळे पाठांतर करावेच लागले नाही.लहानपणी केलेल्या पाठांतराचे हे एक वैशिष्ट्य आहे...नकळतच पाठ होते आणि कायमचे लक्षात राहाते (आता काही पाठ करायचे/ नवीन शिकायचे म्हणजे फार मेहेनत करावी लागते)पण तसेच त्यात एक धोका किंवा दोष पण आहे... तेव्हा जे चुकिचे किंवा सदोष/ अशुद्ध पाठांतर होते ते पण सुधारणे जड जाते. कारण तेव्हा अर्थ वगैरे काही माहितीच नसतो...नुसते कानावर पडते म्हणून लक्षात राहते.माझे रामरक्षेबाबत तसेच काहीसे झाले आहे. काही जे चुकिचे किंवा अशुद्ध पाठ झाले आहे ते आता मला समजून सुद्धा दुरुस्त करता येत नाही.म्हणूनच मी रामरक्षा सॉफ्ट कॉपी स्वरूपात शोधत होतो, म्हणजे सतत वाचून काही चुक दुरुस्त करता आली तर बघावे!सुदैवाने मला नुकतीच ती सॉफ्ट कॉपी मिळाली (अर्थासकट!)...तुम्ही ती इथे डाऊनलोड करू शकता.लवकरच रामनवमी आहे, तोपर्यंत जर जमले तर चुका सुधारायचा प्रयत्न आहे... बघु जमते का तेता. क. - मी रामरक्षा एम पी ३ इथे अपलोड केली आहे...आणि त्याचबरोबर 'मुदाकरात' हे गणपती स्तोत्र (एम पी ३) पण अपलोड केले आहे...~ कौस्तुभ

पद्मश्री सैफ अली खान

दरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो...पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.मी खूप आधीपासून पद्म... Continue Reading →

मानद विद्यापीठांची मान्यता… आणि सरकारी अनुदान

नुकतेच शासनानी काही मानद विद्यापीठांची मान्यता रद्द केली. त्यातील काही सुप्रसिद्ध तर आहेतच पण काही राजकीय लोकांशी संबंधित पण आहेत. आपल्याकडच्या (महाराष्ट्रातील) काही विद्यापीठे पण त्यात आहेत. पटकन आठवणारी नावे म्हणजे कोल्हापूर येथील डॊ. डी. वाय. पाटील विश्वविद्यालय आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवि)आता हा निर्णय कोणी आणि का घेतला..अचानक घेतला का...किंवा तो चूक की... Continue Reading →

भारतातील गरीबांची संख्या वाढली – बरे झाले!

सध्या मी ईकॊनॊमिक्स वाचतो आहे...नुकतीच अर्थतज्ज्ञ सुरेश तेंडुलकर यांच्या अहवालावरची एक बातमी वाचली. त्यांनी ’दारिद्र्य रेषेची’ नवी व्याख्या मांडली आहे, आणि त्यानुसार भारतातील ३७% टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे असा निष्कर्ष मांडला आहे.सध्याची गरिबीची व्याख्या ही १९७३-७४ सालातली आहे. आणि ती उष्मांकावर (Calorie consumption) आधारीत होती (त्यातही शहरातील व्यक्तीला २१०० उष्मांक लागतात आणि खेडवळ व्यक्तीला,... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑