२०२४ दिवाळीच्या हसऱ्या शुभेच्छा! 🪔🪔🪔

दिवाळीच्या दिवसात शुभच्छांच्या मेसेजेसचा भडीमार असतो. बरं मेसेजही स्वतः कष्ट घेऊन लिहीलेले असतील तरी ठीक आहे. पण बहुतेक वेळेस मेसेजेस forward केलेले असतात. म्हणजे माझ्या आईच्या भाषेत पुढे ढकललेले असतात. म्हणून मी परवा एका मित्राला आधीच सल्ला वजा इशारा दिलाः "साधं सरळ "शुभ दीपावली" म्हणून wish करा... उगाच, दिवा तुमच्या दारी, माती-नाती, पणती वगैरे कविता... Continue Reading →

Making of “हम आपके है कौन…!”

मी चित्रपट पाहायला लागलो साधारण १९८५ पासून...असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपट तेव्हापासून पाहिले आहेत. हिंदी मध्ये मला अतिशय आवडलेले (माझ्या काळात प्रदर्शित झालेले) २ चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना आणि हम आपके है कौन...? विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात सलमान खान आहे आणि दोन्ही १९९४ मध्ये (मी १० वी इयत्तेत असताना) प्रदर्शित झाले. अंदाज अपना अपना... Continue Reading →

गणपती बाप्पा मोरया…

गणपती बाप्पा मोरया... सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! मला स्वतःला गणपती उत्सव लाभत नाही असा माझा अनुभव आहे. अनेक वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशीच, किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे काही वाईट, त्रासदायक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आहेत, किंवा घडतात. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. त्याबद्दल लवकरच वेगळ्या ब्लॉग मध्ये लिहीन. पण असे असले तरी मला गणपती देवता,... Continue Reading →

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत!

पु. ल. देशपांडे यांचा कमी प्रचलित असणारा लेख सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात. ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये. आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा... Continue Reading →

मृत्यच्या दाढेतून परत येणं म्हणजे हेच का?

दाढेत भरलेलं सिमेंट निघाल होतं म्हणून तो व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या क्लिनिकमधे गेला. त्याला पाहून ती खट्याळपणे म्हणाली, "आज बऱ्याच दिवसांनी मैत्रिणीची आठवण आली म्हणायची!" तो शांतपणे म्हणाला, "ते पूर्वीचे फिलिंग आता राहिले नाही" मृत्यच्या दाढेतून परत येणं म्हणजे हेच का? 😀😀😀😀😀😀😀😀

जीवन चक्र

एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे. शाळेत असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो. चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो. 😇

Belated World Sleep Day!

Yesterday, 17th March 2023 was the World Sleep Day. However, since I slept early I couldn't wish you yesterday, and hence thought of sending belated wishes! जमेल तेंव्हा, जमेल तितकी घ्यावीथोडी जास्तच , कमी कधी नाही ।अगदी कमी पडलीच,तर त्वरित भरून काढावी ।। निवांत, निश्चिंतनिर्विवाद घ्यावी । सुखद बिछान्यातकिंवा कचेरी च्या खुर्चीवरन लाजता आराधावी ।।... Continue Reading →

विरंगुळाः मराठी वृत्तपत्रांची शोचनीय अवस्था

फरूळेकरांकडून फवारांकडे गेलेल्या फेफरचे संफादक, उफसंफादक, फ्रूफरिडर, फत्रकार आणि समस्त फिंफरीकर आणि फुणेकरांनी, कॉफीमुक्त फरीक्षेसाठी गेलेल्या फथकाला फुरेफुर फ्रयत्न करण्यासाठी फ्रोत्साहन द्यावे !!! #मराठीठारमारी

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला....मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : “मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.”..मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला. 😂😂 मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🐋🐳🐬🐟🐋🐳🐬🦈मराठी भाषेचा शृंगार😅 'मासा' आणि 'माशी' यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही; पण शब्दांची गंमत अशी की 'माशाला' स्रीलिंगी शब्द नाही आणि 'माशीला'... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑