शेतकरी

शेतकरीमाझा मित्र तेजस गोखले ह्यानी केलेली ही कविता...तो स्वतः ही प्रसिद्ध करायला फारसा उत्सुक नव्हता...पण मीच आग्रह करुन इथे प्रसिद्ध करत आहे...तुमच्या प्रतिक्रिया त्याला जरूर कळवा:~ कौस्तुभ

समर्थ रामदास स्वामीं विषयी थोडेसे (बऱ्याच विषयांतरासकट)

नुकतेच मी पुणे मराठी ग्रंथालय इथून समर्थ रामदास यांच्यावरचे एक पुस्तक आणले होते...अचानकच मिळाले आणि जरा चाळल्यावर घ्यावेसे वाटले.तसा मी ’रामदासी’ नाही...म्हणजे रामदासांचे जास्त काही वाचलेले नाही...त्या मानाने तुकारामांना बरेच follow करतो...रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे... Continue Reading →

मराठी पॊडकास्ट: ह्रुदयातले गाणे

माझ्या मराठी पॊडकास्ट वर बरेच दिवसांनी काही गाणी अपलोड केली आहेत...सलील कुलकर्णी, संदीप खरे, बेला शेंडे यांच्या ’ह्रुदयातले गाणे’ मधली काही गाणी तसेच ’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील २ गाणी अपलोड केली आहेत... दमलेल्या बापाची कहाणी... Kaustubh's podcast रुणझूण पैंजण... Kaustubh's podcast ह्रुदयामधले गाणे माझे कधीच नव्हते... Kaustubh's podcast <span class="Apple-style-span" style="font-size:medium;"> बाप्पा...बाप्पा कामच झालं... Continue Reading →

देश माझा, मी देशाचा

नुतकेच मी लालक्रुष्ण अडवाणी यांचे ’देश माझा, मी देशाचा’ हे आत्मचरित्र वाचले. खूप दिवसांनी एक चांगले राजकीय आत्मचरित्र वाचायला मिळाले. तसा मी संघ किंवा भाजप च्या विचारसरणीशी सहमत नाही...किंबहुना विरोधातच आहे. पण तरिही अडवाणी मला नेते म्हणून आवडतात. २००९ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पुण्यातल्या प्रचारसभेलाही मी गेलो होतो - भाजपला मत देणार नाही ह्याची खात्री असूनही... Continue Reading →

ह्यावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

नुकतीच सा रे ग म प ची मेगाफायनल झाली - ह्या वेळच्या पर्वाबाबत निर्णयाची उत्सुकता मला कमी होती...कारण सगळेच professional singers होते. ह्या वेळच्या पर्वाचे मुख्य आकर्षण हे स्पर्धक नसून परिक्षक होते...पण एकूणच त्यांचे ’विवेचन’ आणि ’प्रवचन’ आणि सल्ले ऐकल्यावर त्यापेक्षा देवकी पंडीत बरी असे वाटायला लागले...गाण्यापेक्षा सुरेश वाडकर आणि ह्रुदयनाथ मंगेशकर यांचा mutual admiration... Continue Reading →

जीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा

आयुर्वेद आणि माझे तसे फारसे सख्य नाही...म्हणजे मला त्याबद्दल वाट्टेल ते ’claim’ करणारे लोक आवडत नाही...आणि विनाकारण इतर उपचार पद्धती वर टीका करणेही आवडत नाही...पण आपल्या so-called भारतीय संस्क्रुती मधलाच हा दोष असावा... अहंमन्यतेनी पछाडले असण्याचा. मग ते हिंदू धर्माच्या बाबतीत असो, किंवा हिंदु संस्क्रुती/ पुराण असो, रामदेव बाबांचे ’योग’ आणि ’प्राणायाम’ असो की, हिंदू... Continue Reading →

काय रे देवा… संदीप खरेची कविता.

संदीप खरे ची अजून एक कविता... पावसाळ्याचे निमित्त साधून...खरं तर ’पावसाळा’ म्हणावा असा पाऊस अजून पुण्यात झालाच नाहीये... उगाच आकाशातून कोणीतरी थुंकल्यासारखे चार थेंब पडलेत आत्तापर्यंत...आणि अनेक बेडकांची लग्नं लावूनही काहिही फरक पडला नाही...आता म्हणे बेडूक ही संपले...म्हणजे पुढच्या वर्षी हीच परिस्थिती आली तर बहुतेक आधी लग्न झालेल्य बेडकांना घटस्फोट घ्यायला लावून त्यांचे परत लग्न... Continue Reading →

उत्कट-बित्कट होऊ नये — संदीप खरे

मी आधी म्हटल्याप्रमाणे अधूनमधून मला आवडलेल्या कविता इथे पोस्ट करत जाईन... नुकतेच मला संदीप खरे ह्याच्या कवितांचे कलेक्शन एकाने फॊरवर्ड केले...त्यातलीच ही एक कविता. बरेच दिवसात ’आयूष्यावर बोलू काही’ ला गेलो नाही, त्यामुळे मला तरी ही कविता नवीनच आहे...==========================================उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नयेनको कुठला नवा भार, जुनेच... Continue Reading →

निशाणी डावा अंगठा

नुकताच मी ’निशाणी डावा अंगठा’ हा चित्रपट पाहिला...सुंदर चित्रपट आहे! बरेच दिवसांनी एक चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट पाहिल्याचे समधान मिळाले. (याआधी डोंबिवली फास्ट आणि वळू हे चित्रपट मला आवडले होते....आणि चेकमेट हा आणखी एक वेगळा मराठी चित्रपट आठवतोय. तसे मधले काही चर्चित चित्रपट पहायचे राहून गेले आहे. उदा. गाभ्रीचा पाऊस)बुलढाण्यातल्या रमेश इंगळे-उत्रादकर या प्राथमिक शिक्षकाने... Continue Reading →

विनोद

एकदा एक मुंगी स्कूटर वरून जात असताना एकदम खाली पडते. का?- कारण स्कूटर संपते-----------------------------------------------------------------एका माणसाला ४ बहिणी असतात. तर त्याच्या मुलाचे नाव काय असेल?- आत्याचार-----------------------------------------------------------------भगवान शंकरानी जर त्यांचे आत्मचरित्र लिहायचे ठरवले तर त्या आत्मचरित्राचे नाव काय असेल?- कैलास जीवन!-----------------------------------------------------------------एक मराठी माणूस आपल्या आईच्या आज्जीच्या नावने bank सुरु करतो...तर त्याचे नाव काय असेल?- आय ची आय... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑