Thought of The Day

16th January 2023 Be humble. Be teachable. The universe is bigger than your view of the universe. There's always room for a new idea. Humility is necessary for growth. 🧠

“वाळवी” विषयी…

काल आमच्या movie club च्या मित्रांबरोबर चित्रपट बघायचं ठरलं. नेहेमी हिंदीच बघतो म्हणून यावेळेस मराठी बघूया असा प्रस्ताव मी मांडला, आणि त्याला बाकी दोघं चक्क "हो" म्हणाले. रितेश देशमुखचा "वेड" सध्या जोरात चालू आहे. पण त्याची भाषा अगदीच आनी-पानी-लोनी आहे असं ऐकलं. त्यामुळे तो पर्याय एकमतानी नाकारला. मग नुकताच प्रदर्शित झालेला परेश मोकाशी दिग्दर्शित "वाळवी"... Continue Reading →

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…

काल (१४ जानेवारी) भोगी होती. आज मकरसंक्रांत...म्हणून आज परत एकदा शुभेच्छा! तिलवत् स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यम् ।तिलगुडलड्डुकवत् सम्बन्धेऽस्तु सुवृत्तत्त्वम् ॥ अर्थ - आजपासून तिळासारखी सगळ्यांच्या मनामध्ये स्निग्ध स्नेहभाव निर्माण होवो. सगळ्यांची वाणी गुळासारखी मधुर आणि गोड होवो आणि जसे तीळ आणि गूळ एकत्र येऊन घट्ट लाडू बनतात तशीच आपली नाती घट्ट होवोत. भास्करस्य यथा तेजो... Continue Reading →

मकरसंक्रांतीची आठवण…

मकरसंक्रांती आणि गणेश उत्सव या दोन्ही सणांच्या माझ्या आठवणी, अनुभव विशेष चांगले नाहीत.  आज माझे आजोबा गेले त्याला ३० वर्षे झाली.  आज मी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. काही विशिष्ट अपेक्षा आणि मागण्या सोडून देण्याचा.  आता लक्ष कमावण्यावर/मिळवण्यावर केंद्रीत करणार...! आजपासून २ वर्षांचा ध्यास/प्रवास सुरु... 

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑