मानद विद्यापीठांची मान्यता… आणि सरकारी अनुदान

नुकतेच शासनानी काही मानद विद्यापीठांची मान्यता रद्द केली. त्यातील काही सुप्रसिद्ध तर आहेतच पण काही राजकीय लोकांशी संबंधित पण आहेत. आपल्याकडच्या (महाराष्ट्रातील) काही विद्यापीठे पण त्यात आहेत. पटकन आठवणारी नावे म्हणजे कोल्हापूर येथील डॊ. डी. वाय. पाटील विश्वविद्यालय आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवि)

आता हा निर्णय कोणी आणि का घेतला..अचानक घेतला का…किंवा तो चूक की बरोबर ह्यात मला पडायचे नाही. मला एका वेगळ्याच गोष्टीबद्दल लिहायचे आहे.

ह्या बातमीनंतरच २-३ दिवसात अजून एक बातमी सगळ्या प्रसिद्ध व्रुत्तपत्रात प्रसिद्ध झाली, ज्याची फारशी दखल घेतली गेली नाहे असे मला वाटते. आणि ती म्हणजे UGC नी ह्या मान्यता रद्द झालेल्या युनिवर्सिटीला दिलेल्या अनुदानाचा तपशील. मूळ बातमी इथे वाचा:

पुण्यातल्या टिमवि आणि हरिद्वार इथल्या गुरुकुल कांगडी विश्वविद्यालय या दोन अभिमत विश्वविद्यलयांना (ज्यांची मान्यता नुकतीच रद्द झाली) गेल्या ४ वर्षात र. ४७ कोटी इतके सरकारी अनुदान मिळाले!

अधिक तपशील वाचल्यावर लक्षात येते की यातले रु. ४३.७२ कोटी हरिद्वारच्या गुरुद्वार कांगडी विश्वविद्यालयाला मिळाले आणि टिमवि ला फक्त रु. ३.०२ कोटी मिळाले.

बातमीत दिल्या प्रमाणे हरिद्वारचे विश्वविद्यालय ज्योतीष आणि योगाभ्यास यांचे शिक्षण देते. त्यांच्या वेबसाईट वरील माहितीनुसार वेद, प्राच्यविद्या, आयुर्वेद, सायन्स, आर्टस, मॆनेजमेंट, फार्मसी, ईंजिनिअरिंग, लाईफ सायन्सेस, ह्युमॆनिटीज, मेडिकल इ. अनेक शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. (मुळात ’ज्योतीष’ हा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम म्हणून जिथे शिकवला जातो त्या संस्थेला सरकारी अनुदान देणे चुकीचे आहे असे मला वाटते…पण तो मुद्दा (वादग्रस्त असल्यामुळे) तात्पुरता बाजूला ठेऊ!). या विश्वविद्यालयात सुमारे ४,०२७ विद्यार्थी शिकतात असे ही बातमीत म्हटले आहे.

बातमीत म्हटल्याप्रमाणे टिमवि सोशल सायन्स, हेल्थ सायन्स, जर्नलिझम, ईंजिनिअरिंग, आयुर्वेद, फाईन आर्टस, आर्टस ई. अनेक शाखांमधले अभ्यासक्रम राबवते (ह्यात ज्योतीष येत नाही!) ५,००० हून अधिक विद्यार्थी रेग्युलर कोर्सेस (फुल टाईम) करत आहेत. तर सुमारे ३४,३१२ जण बहिस्थः किंवा अर्ध-वेळ अभ्यासक्रम करत आहेत. थोडक्यात टिमविचा पसारा खूप मोठा आहे!

पुण्यातल्या लोकांना माहिती असेल की टिमवि खूप चांगले काम करत आहे…विशेषतः बहिस्थः, किंवा ज्यांनी काही कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडलेले होते, किंवा ज्यांना नोकरीबरोबरच पुढचे शिक्षण पूर्ण करावे लागत आहे त्यांच्यासाठी टिमवि एक मोठा आधार आहे. बाकिची कॊलेजेस, युनिव्हर्सिटी हे ज्यात जास्त पैसे कमावता येतील तेच अभ्यासक्रम राबवतात..म्हणजेच शक्यतो पूर्णवेळ. टिमवि चे तसे नाही…शिवाय टिळक या नावाची पत (आणि वलय) या संस्थेनी गेल्या ७० हून अधिक वर्षात कमी होऊ दिलेली नाही…

मला मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे ४७ कोटी अनुदानापैकी टिमविला फक्त रु. ३ कोटीच का मिळाले. (जरी टिमविमुळे जवळ जवळ ४०,००० विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत आहे) आणि हरिद्वारच्या विश्वविद्यालयाला (जेथे फक्त ४००० जण शिकतात आणि एखाद्या व्यावसायिक संस्थेसारखे तिथे सगळे अभ्यासक्रम राबवले जातात – अगदी ज्योतीषापासून ते सायन्स पर्यंत…) तब्बल रु. ४३ कोटी मिळतात! (म्हणजे टिमविची १४-१५ वर्षांचे अनुदान एकाच वेळेस!)

आता ह्यात अनेक गोष्टी असतील ज्यामुळे हा फरक पडत असेल. उदा. सरकारी ढवळाढवळ नको म्हणून टिमवि (किंवा इतर अनेक संस्था) अनुदान स्वतःहून घेत नसतील किंवा कमीत कमी घेत असतील. दुसरी शक्यता म्हणजे राजकीय लागेबांधे आणि त्यातून जास्तीत जास्त फा

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑