डॉ. विकास दिव्यकीर्ति interview

लल्लनटॉप हा Youtube चॅनेल बराच लोकप्रिय असला तरी मला विशेष आवडत नाही. त्यांचा अँकर सौरभ हा अति आगाऊ आणि उगाचच पोक्त आहे (१९८३ सालाच जन्म आहे). 

काही काही interview चांगले असतात, जर guest चांगले असतील तर. असाच एक interview मला माझ्या मित्रानी (अनेकदा) recommend केला. तो म्हणजे दृष्टी IAS च्या डॉ. विकास दिव्यकीर्ति यांचा interview. 

 डॉ. विकास दिव्यकीर्ति हा संघी आहे असे पुसट कानावर आले होते, त्यामुळे मी आजवर दुर्लक्ष केले होते. तसेही IAS कोचिंगवाले मला जास्त आवडत नाहीत. Mock IAS interviews मी खूप बघितले आहेत, आणि बघत असतो. अनेक IAS officers चे परीक्षार्थी असतानाचे आणि IAS झाल्यावरचे interviews पण बघतो. एकूणच IAS च्या दर्जावरचा माझा विश्वास, आदर कमी झालाय. अभ्यासात खोली नसते…नुसतीच भाराभर माहिती. अर्थात, सरसकट असं म्हणणं चुकीचं आहे…काही चांगले दिसतातही. पण परीक्षेचा format च असा आहे की उथळपणा आणि माहिती चा मारा यांवर जास्त भर असतो. असो. 

पण माझ्या मित्राने खूपच गळ घातली डॉ. विकास दिव्यकीर्ति चा interview बघायची. शेवटी त्यानी रामबाण उपाय काढला. तो म्हणाला: “हा संघी होता पण आता बदलला.”. 

आता मला नकार देणे अवघड होते. म्हणून पाहिला interview, आणि आवडला सुद्धा!

मित्रानी सांगितल्याप्रमाणे तो अजून संघी आहे असे  वाटले नाही… आणि त्याची personality आवडली. म्हणून तो interview इथे पोस्ट करत आहे. 

त्याचबरोबर डॉ. विकास दिव्यकीर्ति चा Article ३७० बद्दलचा video पण आवडला. 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑