श्रुती भावे – the violin player

सध्या मी नियमित पणे evening walk ला जातोय…sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी जे काही उपाय सुचवले त्यातला “चालणे” हा मला जास्त आवडला. बरेचदा माझे मित्र पण बरोबर येतात. त्यातल्या एकाने मला नवीन shoes घ्यायला लावले; त्यावरून मी त्याला बरंच टोचून बोललो, म्हणून तो आता कर्तव्यबुद्धीने माझ्याबरोबर चालायला येतो.

त्या मित्राला संगीत, वादन वगैरे ची आवड आहे. तो थोडाफार तबला पण शिकला आहे, आणि आता परत अनेक वर्षांनंतर शिकायच्या तयारीत आहे. त्यामुळे आम्ही walk ला गेल्यावर संगीत या विषयावर बरेचदा गप्पा मारतो.

परवा त्याने violin वादक श्रुती भावे हिच्याबद्दल सांगितले.

माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तिची अजून काही गाणी बघितली आणि एक मुलाखत पाहिली. मला एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीबद्दल किंवा प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडतं. त्यातून बऱ्याच गोष्टी समजतात आणि शिकायला मिळतात.

अशीच एक मुलाखत पराग माटेगावकरनी (सध्याच्या पिढीतील गायिका, नटी केतकी माटेगावकर हिचे वडील आणि गायिका सुवर्णा माटेगावकर हिचे पती) घेतली आहे. पराग माटेगावकर चा हा चॅनेल मी बरेचदा बघतो. अनेक चांगल्या मुलाखती त्याने घेतल्या आहेत. 

मुलाखत सुरु होताच मला जाणवले की श्रुती भावाचा चेहरा कोणासारखा तरी दिसतो. आणि लगेचच त्याचा खुलासा झाला. अभिनेत्री गिरीजा ओक ही तिची आत्येबहीण. नंतर मला घराच्या सूत्रांकडून असेही समजले की तिचा भाऊ हा गायक असून तो सा रे ग म प मध्ये एका पर्वात स्पर्धक होता. 

मला तिची मुलाखत आवडली…पण violin वादन तितकंसं नाही आवडलं. कदाचित प्रभाकर जोग, L सुब्रमणियम इ. दिग्गजांचं वादन खूप ऐकल्यामुळे असेल…पण तरी तिचा प्रयत्न आणि चिकाटी/निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. Down to earth आणि प्रांजळ वाटली.

तुम्हाला अशा विषयाची आवड असल्यास तिची मुलाखत नक्की बघा… 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑