भानू काळे हे एक प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार आणि विचारवंत आहेत. त्यांचे “बदलता भारत” हे पुस्तक मी १५-१६ वर्षांपूर्वी वाचले आणि मला ते खूपच आवडले. जागतिकीकरण आणि त्याचा भारतावर होत असलेला परिणाम यांवर मराठीत फारच कमी पुस्तके, लेखन आहे. भानू काळे यांनी स्वतः भारताच्या विविध भागात हिंडून ह्या विषयावर खूप छान पुस्तक लिहिले!
त्यानंतर मी ते संपादित करत असलेले “अंतर्नाद” हे मासिक घ्यायला लागलो. अतिशय दर्जेदार आणि सकस, वैचारिक लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. मराठीमध्ये दर्जेदार मासिके दुर्मिळ होत असताना अंतर्नाद चालवणे हे एक आव्हानच होते. मी जवळ जवळ ५-६ वर्षे अंतर्नाद चा सभासद होतो. नुकतेच अंतर्नाद च्या निवडक अंकांचा संग्रह नव्याने प्रकाशित झालेला एका पुस्तकांच्या दुकानात दिसला.
त्यामुळे भानू काळे यांची २ भागातली मुलाखत थिंक-बँक वर दिसताच मी लगेच पहिली. त्या चॅनेलच्या अँकरबद्दलचे माझे प्रतिकूल मत मी यापूर्वीच लिहिले आहे. पण guest चांगले असतील तर मी अजूनही काही मुलाखती बघतो…त्यातलीच एक म्हणजे भानू काळे यांची मुलाखत.
मुलाखतीच्या thumb nail मध्ये जो मथळा देतात तो नेहेमीच चुकीचा असतो किंवा वादग्रस्त असतो. ते ह्यावेळेसही खरे आहे…आणि त्यामुळेच प्रतिक्रिया भडक आहेत. पण तरीही संपूर्ण मुलाखत (दोन्ही भाग) पहिले तर आपल्याला भानू काळे हे विचारी आहेत आणि त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे हे जाणवेल.
नक्की बघा ही मुलाखत…

Leave a comment