सध्या, म्हणजे जानेवारी २०२४ पासून मी परत एकदा श्रीधर फडके यांची गाणी जास्त प्रमाणात ऐकत आहे. काही नवीन गाणीही ऐकायला मिळाली.
श्रीधर फडके यांचं माझ्या आयुष्यात एक विशेष स्थान आहे. विशेष आठवणी आहेत.
त्यांची गाणी मला खूपच सुमधूर आणि वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. आणि बरेचदा माझ्या प्रकृतीला किंवा स्वभावाला साजेशी वाटतात. सुरेश वाडकर यांचा आवाज श्रीधर फडके यांची गाणी गाताना खूपच हळूवार आणि मन शांत/प्रसन्न करणारा वाटतो. आरती अंकलीकर यांच्या आवाजाच्या पोताला साजेशी गाणी तेच बनवू शकतात. आणि त्यांचा स्वतःचा आवाज सुद्धा मला खूप आवडतो.
सध्या Spotify वर मी ऐकत असलेली गाणी इथे देत आहे. नक्की ऐकून बघा…

Leave a comment