नव्या पिढीतल्या, आजच्या मराठी संगीत कलाकारांमध्ये मला राहुल देशपांडे आवडतो. कधी कधी काही काही गोष्टी आवडत नाही…पण एकूण सध्या तरी आवडणाऱ्या गोष्टी खूप जास्त आहेत. सध्या तरी म्हणायचं कारण असं की हल्ली कोणाबद्दलही शाश्वती देता येत नाहीत. त्यामुळे कायम उदो उदो करावेत असे फार कमी लोक आहेत. असो.
अमुक तमुक ह्या पॉडकास्ट चा होस्ट मला आवडत नाही. अतिशय उथळ आणि काहीही वजन नसलेला माणूस आहे तो. त्याचे काही सिरीयस विषयांवरचे एपिसोड बघा, सेक्स किंवा जरा प्रौढ गोष्टींवरचे एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते. पण जर गेस्ट चांगला असेल तर हा कार्यक्रम बघायला माझी हरकत नसते.
नुकताच “अमुक तमुक” चा राहुल देशपांडे बरोबरचा एपिसोड रिलीज झाला आहे. मला आवडला म्हणून इथे शेअर करत आहे.

Leave a comment