मला लहानपणी (म्हणजे १९८०-९० च्या दशकात) मराठी चित्रपट सृष्टीतले हिरो/चरित्र कलाकार जास्त आवडायचे – अशोक सराफ सर्वात जास्त. तसेच दिलीप प्रभावळकर आणि श्रीराम लागू सुद्धा. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे कधीकधी, सरसकट नाही.
अभिनेत्री तशा कमी आवडायच्या…हिंदी चित्रपट सृष्टीमधल्याच जास्त आवडायच्या. पण तरीही मराठी मधल्या किशोरी शहाणे आणि थोड्या प्रमाणात वर्षा उसगांवकर आवडायच्या.
त्यानंतरच्या काळात म्हणजे २००० नंतर मराठी नायक तसा कोणीच आवडला नाही. भरत जाधव आणि मंडळी अगदीच टुकार. अंकुश चौधरी जरा बरा. बाकी सुमारं!
पण अलिकडच्या मराठी अभिनेत्रीमध्ये मला लई ताम्हणकर आवडते! आधी फक्त दिसायला आणि ठसका म्हणून आवडायची, पण अभिनयही तसा चांगलाच आहे. बाकी अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) आणि प्रिया बापट मला आवडत नाहीत. श्रुती मराठे सुंदर आहे पण ती नुसतीच मॅाडेल म्हणून. आणि ती आगाऊ पण वाटते.
ह्या शिवाय माझी आवडती नटी म्हणजे वैदेही परशुरामे. अभिनेत्री म्हणून कशी आहे माहिती नाही…कारण मी फारसं काम बघितले नाही. फक्त हिंदी “सिंबा” मध्ये बघितलंय. पण एकूणच ती प्रसन्न आणि सुंदर, साजूक वाटते!
नुकताच तिचा “व्हायफळ” चॅनेलवर दीर्घ interview प्रसिद्ध झालाय. अजून मी पाहिला नाहीये, फक्त पहिली ८-१० मिनिटे पाहिला आणि इथे share करायचं ठरवलं.
वैदेही ही माझ्या type ची नटी आहे. किशोरी शहाणे, वर्षा उसगांवकर सारखी. सई “माझ्या type” ची नाही असं वाटू शकेल…पण सई मला प्रचंड आवडते!
त्यामुळे सध्या लाडक्या (मराठी मधल्या) आहेत: सई ताम्हणकर आणि वैदेही परशुरामे.

Leave a comment