भारताच्या राजकारणात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व अशी उलथापालथ चालली आहे. तुम्ही संघोटे असाल तर तुम्हाला तसं वाटणार नाही. पण मी सुज्ञ आणि विचारी लोकांबद्दल बोलतोय.
राजकारण गढूळ झालंय आणि त्यात २-३ ठळक मुद्दे आहेत. पहिला: भारताचे संविधान, घटना, भारताचे निधर्मी प्रजासत्ताक हे अस्तित्व धोक्यात आहे. दुसरा सध्याच्या संघी हुकूमशाहाकडून सर्वोच्च न्यायालय आणि एकूणच न्याय व्यवस्था यांचा अवमान चालू आहे. आणि तिसरं EVM च्या माध्यतातून “free आणि fair” निवडणुका होतील का याबद्दल शंका वाटावी असे धोके जाणकारांनी मांडले आहेत.
या सर्व मुद्यांबद्दल बोलायला जे अतिशय विद्वान, निर्भीड आणि निष्पक्ष लोक आहेत त्यातले २-३ जण नुकतेच एका परिसंवादाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यातले एक म्हणजे घटनातज्ञ उल्हास बापट. दुसरे EVM च्या त्रुटी, धोके समर्पकपणे मांडणारे संगणकतज्ज्ञ माधव देशपांडे. तिसरे राजकीय व्यक्ती, पण अर्थशास्त्र तज्ज्ञदेखील असलेले कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर…आणि अजून एक राज्यघटना तज्ज्ञ नितीश नवसागरे यांचा हा दीर्घ परिसंवाद अगदी ना चुकता, संपूर्ण, प्रश्नोत्तरासहीत ऐकावा असा आहे.
जर भारताच्या राजकारणात संघाच्या आणि भाजपच्या विध्वंसक वृत्तींकडून, शक्तींकडून काय चाललं आहे हे समजून घ्यायचं असेल तर नक्की बघा, ऐका आणि शेअर करा

Leave a comment