काल, म्हणजे ८ एप्रिल २०२४ हा दिवस म्हणजे कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी होती. सध्या निवडणूकांची धामधूम असल्यामुळे शासन, माध्यमे यांना त्याचा विसर पडला असावा. लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात एक लेख होता, पण बाकी विशेष काही नाही.
कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर हे शास्त्रीय संगीतातील माझ्या आवडीचे गायक कलाकार आहेत, पं. अभिषेकी, वसंतराव देशपांडे हे देखील आवडतात. पण कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशी हे जास्त प्रिय.
कुमार गंधर्व याच्यवर पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेला लेख, त्यांनीच घेतलेली मुलाखत यांमुळे कुमारजींबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यांचे आजारपण, त्यानंतर बदललेली शैली याबद्दल कुतूहल होते. कालांतराने त्यांच्या संगीतविचार खुलवून सांगणाऱ्या मुलाखतीही Youtube वर पाहिल्या आणि निर्गुणी भजनंही.
वसंतराव देशपांडे यांचा नातू राहुल देशपांडे हा आजोबांइतकाच, किंबहूना त्यापेक्षा जास्त कुमार गंधर्वांमुळे प्रभावित झाला होता हे ऐकून त्यांच्याबद्दलचे कौतुक, आदर वाढला.
आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी यांची वास्तूरचना, त्यातील सौंदर्य, संस्कृती यांवर एक सुंदर documentary Youtube वर आहे, जी मी या ब्लॅागवरही प्रसिद्ध केली आहे. त्यात एके ठिकाणी कुमारजींचे एक निर्गुणी भजन वापरले आहे. दोशी जी मुल्य सांगत असतात त्याला पूरक असे ते गाणे आहे. त्याचा अगदी काही सेकंदांचा आणि मधलाच असा तुकडा वापरला आहे. गाणे ऐकतानाच ते कोणी गायले आहे आणि कुठले गाणे याचा शोध मी घेतला आणि ते कुमारजींचे आहे असे समजले. ते गाणे किती समर्पक आहे हे आपल्याला ती documentary पाहताना जाणवेल.
कुमार गंधर्वांवर बनवलेला “हंस अकेला” हा माहितीपट Youtube वर नक्की बघा. लिंक इथे देत आहे.
अजून एक छोटी माहितीवजा स्टोरी BBC मराठी ने नुकतीच प्रसारीत केली आहेः ती पण इथे देत आहेः
कुमार गंधर्वांच्या काही चांगल्या मुलाखती, चर्चा, त्यांचे संगीत विषयक विचार इथे पोस्ट करत आहे.
शेवटी, कुमारजींचेच पुत्र पं मुकुल शिवपुत्र यांचे माझे अत्यंत आवडते गाणे इथे share करतोय. ह्या गाण्याचे त्यांचे सादरीकरण मला स्वतः कुमार गंधर्व किंवा इतर कोणाहीपेक्षा जास्त आवडतं…बघा कसं वाटतंय…

Leave a comment