वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग एका बोर्डवर लिहीला आहे. अतिशय कळकट्ट अवस्थेतल्या त्या बोर्डकडे कुणाचे लक्षही जात नसेल.
पण मला मात्र तो बोर्ड वाचून फार नवल वाटले. तुकारामांनी किती विविध विषयांवर अभंग रचले आहेत, विचार केला आहे. आणि किती कमी शब्दात गहन अर्थ मांडला आहे. अगदी मृत्यू आणि अंतिम विधी यांवर सुद्धा…आज सहा महिने झाले, म्हणून आठवण आली आणि हा अभंग आठवला.
झाला प्रेतरूप शरीराचा भाव ।
लक्षियेला ठाव स्मशानीचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोध माय ।
म्हणती हायहाय यमधर्म ॥२॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ।
ज्ञानाग्नि लागला ब्रह्मत्वेसि ॥३॥
फिरविला घट फोडिला चरणीं ।
महावाक्य ध्वनीं बोंब झाली ॥४॥
दिली तिलांजुळी कुलनामरूपासी ।
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले ॥५॥
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप ।
उजळीला दीप गुरूकृपा ॥६॥

Leave a comment