अच्युत गोडबोले यांनी नुकतेच “AI ची जादू आणि उद्याचे जग” या विषयावर एक अतिशय माहितीपूर्ण आणि रसाळ व्याख्यान दिले.
अच्युत गोडबोले हे अतिशय विद्वान आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी तळमळ असलेले व्यक्ती आहेत. बरेचदा ते पाल्हाळ लावतात आणि आत्मप्रौढी देखील बऱ्याच प्रमाणात असते. पण त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि चांगल्या हेतूबद्दल शंकाच नाही. अजून ए चांगली गोष्ट म्हणजे ते हे सगळं मराठी भाषेत करतात.
सध्या मी AI/ML, Gen AI यावर एक कोर्स करत आहे. ते शिकवणारा शिक्षक देखील अतिशय जाणकार आणि शिकवण्याविषयी तळमळ असलेला असा आहे. त्याच्यामुळे मला ह्या क्षेत्राची खूप चांगली माहिती मिळाली आणि मिळत आहे.
त्यामुळेच गोडबोले यांचे हे व्याख्यान मला आवडले. बऱ्याच गोष्टी त्यांनी (धावत्या स्वरूपात का असेना पण) नेमकेपणाने आणि अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या आहेत.
त्यामुळे आपण कुठल्याही वयोगटात किंवा क्षेत्रातले असलात तरी हे व्याख्यान नक्की ऐका…

Leave a comment