मराठी भाषेत पु. भा. भावे हे एक नामवंत कथाकार होते. व. पु. काळे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील, हे कथाकार जास्त प्रसिद्ध आहेत. G A कुलकर्णी हे दीर्घ कथा आणि गूढ कथांसाठी सुप्रसिद्ध होते. पु. भा. भावे हे तितके प्रसिद्ध नसले तरी बरेच प्रचलित होते.
नुकतीच त्यांच्या “१७ वे वर्ष” या कथेवर आधारीत त्याच नावाची एक short film Youtube वर प्रकाशित झाली.
https://youtu.be/ol4bQSyqLhM?si=ssQfB41cZ83mJUqk
एक १६-१७ वर्षाचा मुलगा आणि त्याची वहिनी (वाड्यातील एक भाडेकरू) यांच्यावर आधारीत ही कथा आहे.
तुम्हाला कशी वाटली बघा.
मला फारच अर्धवट, अपूर्ण वाटली. नीट शेवट किंवा समारोप नसलेली…काय म्हणायचे आहे ते अस्पष्ट असलेली.
आता हा कथेतलाच दोष आहे की short film चा ते माहिती नाही. कारण मी मूळ कथा वाचलेली नाही आणि मला online सापढली देखील नाही.
पण मराठी short films अगदीच तुरळक असल्यामुळे हा प्रयत्न लोकांपर्यंत पोचावा ही सदिच्छा! कदाचित हळू हळू दर्जेदारमराठी साहित्यावर आधारीत short films, web series येतील. मराठीत त्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध आहे.

Leave a comment