1. एक जोडपं… पतीचं नाव अनंत…पत्नीचं अनुपमा… पतिराज बाजारात चाललेत… पत्नीला विचारतात “काय अनू?”…
तिचा प्रतिप्रश्न… “काय अंता?”
2. दारूच्या दुकाना बाहेर पाटीः “भव्य दारू सोडा योजना. आत चौकशी करा “. आत गेल्यावर कळतं – “दोन दारूच्या बाटल्यांवर एक सोड्याची बाटली मुफ्त. त्वरा करा”…
————————————————————————————-
रुग्ण… डॉक्टर , अलिकडे मला शौचास साफ़ होत नाही.
डॉक्टर… असे करा, पलीकडे जावून बसत चला.
पुढची ओळ,
रुग्णः अहो, असे नाही! मला अलीकडे शौचाला होत नाही.
डॉक्टरः मग अन्वरकडे जा.
————————————————————————————-

Leave a comment