मराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले?

BaalBharati

नुकतेच आमच्याकडे “शालेय शिक्षण” या विषयावरून रसाळ वाद झाले. SSC बोर्ड पासून CBSE/ICSE बोर्ड पर्यंत आणि Home Schooling पासून Boarding School पर्यंत अनेक मुद्दे एकाच वेळेस चर्चेत होते. शिक्षणाचा दर्जा, अभ्यासक्रमाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा/संस्थेचा दर्जा इत्यादीपासून सुरुवात होऊन मग हळू हळू हल्लीचा “ट्रेंड” काय, “पीअर ग्रुप” चं मत काय, “convenience over curriculum” अशा वाटेने चर्चा-cum-वाद झाला… अर्थात एका दिवशी किंवा एका बैठकीत नाही तर काही दिवस/आठवडे या कालावधीत.

शेवटी सध्याच्या अभ्यासक्रमात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही SSC बोर्ड आणि CBSE बोर्ड यांची Science विषयाची १० वी ची पुस्तकं विकत आणली. ती ५-१० मिनिटे चाळल्यावर  SSC बोर्डकी CBSE बोर्ड हा प्रश्न निकालात निघाला. SSC बोर्डाच्या पुस्तकाचा दर्जा इतका इतका…इतका जास्त सुमार आहे की त्याबद्दल चर्चा करणेही निरुपयोगी आहे.
अर्थात माझ्या वेळी SSC ची पुस्तकं फार ग्रेट होती असं नाही…आणि माझ्या वेळची CBSE ची पुस्तकं पाहण्याचं तेव्हा आमच्या डोक्यातही आलं नव्हतं. मुळात शाळाच “घराजवळची, चालत जात येण्यासारखी आणि वडील आणि आजोबा जिथे शिकले ती” अशा साध्या विचारातून निवडलेली… त्यामुळे अभ्यासक्रम compare करणे वगैरे कोणी केलं असण्याची पुसटशीही शक्यता नाही.
पण एक चांगली गोष्ट म्हणजे, मी माझ्या वेळची बालभारतीची काही पुस्तकं अजूनही जपून ठेवली आहेत. सगळ्या विषयांची नाहीत, पण मराठी विषयाची ४-५ इयत्तांची, गणिताची, इतिहासाची, भूगोलाची २-३, Science ची १-२ अशी पुस्तके आहेत.

ह्या चर्चेच्या निमित्ताने मी ती पुस्तके पुन्हा उघडून बघितली… तितकी वाईट नव्हतं आमचं curriculum – विशेषतः मराठी, maths, science. आत्ताच्या SSC बोर्डाच्या पुस्तकांशी तुलना केली तर फारच चांगली!
गंमत म्हणजे मला मराठीचे काही धडे (गद्य) आणि कविता (पद्य)  अजूनही  आठवतात, पाठ आहेत. त्यांच्याशी संबंधित शाळेतले प्रसंग, शिक्षकांनी दिलेली उदाहरणे ही लक्षात आहेत – सगळी नाही, पण काही ठळक.
त्या नंतर सहज म्हणून मी इंटरनेटवर ही सगळी पुस्तके मिळतात का ते शोधत बसलो. बाकीच्या विषयांची नाहीत पण मराठी विषयाची सर्व पुस्तके (१ ली ते ८ वी) बालभारती च्या वेबसाइट वर Archive विभागात आता उपलब्ध आहेत. तुम्ही ती इथून डाउनलोड करू शकता. फक्त सध्याच्या अभ्यासक्रमाची नाही तर मागच्या ३-४ अभ्यासक्रमाची. म्हणजे सिरीज-१ ची पुस्तके बहुदा १९८०-१९८५ च्या काळातली असतील. त्यानंतर सिरीज-२ ची पुस्तके… असे.
ते सापडल्यावर मी अजून जुनी पाठ्यपुस्तके सापडतात का ते बघत होतो… माझ्या वडिलांच्या काळातली. आणि गंमत म्हणजे मला वडिलांच्या काळचे नाही परंतु त्याच्याही खूप आधीच्या काळाचे, म्हणजे माझ्या आजोबांच्या ही आधीच्या काळचे मराठी विषयाचे क्रमिक पुस्तक सापडले – त्यावर १९०६ सालाचा शिक्का आहे, आणि ते “मराठी तिसरी” चे मुंबई इलाख्याचे क्रमिक पुस्तक आहे असं दिसतंय…किंमत ६ आणे (४ आणे म्हणजे २५ पैसे).
मी एक गोष्ट खूप पूर्वी वाचली होती… “गोखल्यांचे रास्ते कसे बनले?” गोखल्यांच्या एका शाखेचे आडनाव बदलून रास्ते झाले… शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळात… त्याबद्दलची ती गोष्ट होती.
बहुदा कुठल्या तरी दिवाळी अंकात किंवा मासिकात त्याबद्दल लिहिले होते. माझ्या वडिलांना ती गोष्ट चांगली माहिती होती. त्यांच्या पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात ती गोष्ट धडा म्हणून होती. आणि नवल म्हणजे ह्या १९०६ सालच्या मराठी तिसरीच्या पुस्तकात तो धडा आहे (क्रमांक ११)!
एकूणच ते १९०६ सालचे पाठ्यपुस्तक खूप जास्त दर्जेदार आहे! आणि मुख्य म्हणजे प्रत्येक धड्याच्या शेवटी “गाळलेल्या जागा भरा”, “एका वाक्यात उत्तरे द्या” सारखे आचरट प्रश्न नव्हते. आपली शिक्षणपद्धती “मार्क्स-वादी” व्हायच्या पूर्वीचा काळ होता तो!

असो. हे मराठी तिसरीचे पुस्तक Marathi-Third-Book नक्की वाचा. आणि अजून अशीच जुनी दुर्मिळ

पाठ्यपुस्तके मिळाली तर शेअर करा…

P.S.: For Alternate Link to Marathi Third Book Click Here.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑