हा मेसेज मला WhatsApp वर आला…सर्व मराठी वाचकांना आवडेल म्हणून इथे देत आहे…
गोरीगोरी पान फुलासारखी छान,
दादा, मला एक वहिनी आण
गदिमा यांचं हे सुंदर बालगीत…श्रीनिवास खळे यांची गोड चाल… आशा भोसले यांच्या लडिवाळ आवाजात आपण हे बालगीत अनेकदा ऐकलंय…
आता ऐका-व्हायोलिनवर…
खूप बारकाव्यांनिशी अप्रतिम वाजवलंय…खास करून 2:16 ते 2:37 चा भाग…केवळ अप्रतिम….!!! या गाण्यातील शेवटचे कडवे, त्यातील पहिली ओळ:
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा…
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा…
या ओळींतील गट्टी हा शब्द आपण जसा उच्चारतो, अगदी तसाच त्यांनी व्हायोलिनचा बो उचलून सुंदरपणे वाजवला आहे…जरूर ऐका, पहा…😊
ज्यांना मूळ गाणे माहिती नाही त्यांनी ते इथे ऐका…आणि परत व्हायोलिन व्हर्जन ऐका…

Leave a comment