#अण्णा #निमस
आटपाट नगर होतं.
फार पूर्वी म्हणजे इंग्रजांच्या राजवटीच्या काळात त्या गावात “अण्णा निमस” नावाचा अतिशय गुणवान आणि चारीत्र्यवान मुलगा राहात असे.
सरस्वती साक्षात त्याच्या जिव्हेवर विराजमान होती..
त्याच्या हुशारीची ख्याती दशदिशात पसरली होती.
त्याने बोललेलं प्रत्येक वाक्य हे सुविचारच जणू !!
अण्णा मोठा होत गेला.
सुविचार लिहीत गेला.
प्रत्येक सुविचाराखाली तो त्याचा सिग्नेचर मार्क लिहीत असे..”अण्णा निमस”..
त्याची सुविचारांची पुस्तके ही निघाली.
पण ती इंग्रजांनी दडपली व त्याला तुरूंगात टाकले.
शेवटी तो तुरूंगातल्या जेवणात आलेला केस खाऊन मेला.
त्याच्या पुस्तकांची ब्रिटीशांनी इंग्रजी भाषेत भाषांतरे छापून मुळ पुस्तके जाळून टाकली.
व “अण्णा निमस” चा “Anonymous” करून टाकला..
परत विचारू नका Anonymous म्हणजे कोण ते ?? 🤣

Leave a comment