🎬 _”धनंजय माने इथेच राहतात का ?” 30 वर्षानंतरही ‘अशी ही बनवाबनवी’ची जादू कायम आहे!
😍 तुफान विनोदी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला आज 30 वर्षे पूर्ण झाली, 23 सप्टेंबर 1988 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
🎭 लक्ष्या, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या तुफान कॉमेडीमुळे या चित्रपटाने अख्खं दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि अजूनही या चित्रपटाच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत !
👉 या चित्रपटातील काही विशेष असे डायलॉग
😄 धनंजय माने इथेच राहतात का ?
😂 हा माझा बायको पार्वती.
😄 निरंजन बाबाचा आंबा
😂 तुमचे 70 रुपये पण वारले.
😄 लिंबू कलरची साडी
😂 हा शुद्ध हलकटपणा आहे माने

चित्रपटाचा दुसरा भाग हा तसा ठीकठाक होता…परंतु पहिला भाग (सुधीर जोशी असेपर्यंतचा) अप्रतिम होता!
धुमधडाका, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी हे तीन चित्रपट आणि शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक ह्यातील काही निवडक भाग हे उत्क्रृष्ट विनोदी अभिनयाचा वस्तुपाठ म्हणून बघितले पाहिजेत!
सुदैवाने मी ९० च्या दशकात ते सगळे एंजाॅय केले!

Leave a comment