गुंता…

गुंता कुठलाही असो, तो सोडवता येतोच!

करायचं काय तर पेशन्स वाढवायचा.
सापडलेले एक टोक एका खुंटीला टांगून ठेवायचे.

दुसरे विक्रमादित्यसारखे आपल्या हातात ठेवायचे. मग आपल्याला वाटतं, की गुंता आता सुटणार…पण तसं नसतं. आपल्याला अजून एक खुंटी लागते दोन टोकांच्या मध्ये असलेली भेंडोळी तात्पुरती टांगायला.

मग दोन्ही टोके आलटून पालटून गुंता सोडवत न्यावा लागतो, आपोआप नाही सुटत…गुंता जरी आपण केलेला असला, तरी भोगा आपल्या कर्माची फळं काटेरी काटेरी असे म्हणून तो सुटत नाही. अनेकदा टीम लागते, गुंता सोडवायला.

हे सगळं आयुष्याचे तत्वज्ञान वगैरे काही नाहीये. मागच्या वर्षी गुंडाळून ठेवलेल्या लाईट्सच्या माळा सोडवताना, सुचलेले विचार आहेत एवढंच!

दिवाळीच्या हसऱ्या शुभेच्छा!

(इंटरनेट च्या महाजालामधील वेचलेले शिंपले)

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑