मागच्या रविवारी अचानक हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईल वर हल्ला केला आणि अनेक लोकांना मारले आणि १०० पेक्षा जास्त लोकांना पळवून नेले. त्याविरोधात लगेचच इस्राईलने भयंकर आक्रमक कारवाई सुरु केली आणि युद्धाची घोषणा केली.
ह्या सगळ्यामुळे हा वाद नक्की काय आहे यावर पुन्हा लेख, चर्चा, WhatsApp संदेश सुरु झाले. पण हा विषय अगदी खोलात समजून घ्यायचा असेल तर डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचे lecture आवर्जून पाहावे.
४ तासांपेक्षा दीर्घ असे हे lecture अतिशय माहितीपूर्ण आणि विषयाला धरून, कोणताही दूजाभाव न करता केलेले आहे.
डॉ. दिव्यकीर्ती यांच्याबद्दल मी याआधीही लिहिले आहे. त्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि अभ्यासू दृष्टिकोन मला आवडतो.
हे भाषण हिंदी मध्ये आहे. पण तुम्हाला या विषयाबद्दल खरंच संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर नक्की बघा…
