राहुल देशपांडे अभिनित “अमलताश” हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी येऊन गेला. हा खरं तर त्याचा पहिला चित्रपट… “मी, वसंतराव” च्या ही आधीचा. पण तो खूप उशिरा प्रदर्शित झाला.
थिएटर मध्ये कधी आला आणि कधी गेला ते समजलंच नाही. नंतर तो OTT वर आला तेव्हा मी एकदा पहायला सुरुवात केली होती, पण जेमतेम 10 मिनिटे पाहिल्यावर काही कारणाने बंद केला होता आणि नंतरही पाहण्याचा योग आला नाही.
पण काल राहुल देशपांडे नी संपूर्ण चित्रपट त्याच्या Youtube चॅनेल वर अपलोड केल्याचं पाहिलं आणि मग रात्री उशिरा मोबाईल वरच पहिला.
फारच सपक वाटला. म्हणजे cinematography आणि प्रकाश योजना अप्रतिम आहे. मला heroine पल्लवी परांजपे पण आवडली. आमिर खानच्या “धोबी घाट” मधल्या मोनिका डोग्रा हिचा भास झाला.
संगीत, पार्श्वसंगीत ही उत्तम. पण बाकी काहीच आशय नाही.
संवाद चांगले आहेत पण त्याला depth नाही. चित्रपटाला काही खूप गहन सांगायचं आहे असं वाटतंच नाही. त्यामुळेच अगदी सपक वाटला. रंग, वास चव नसलेला. पण वाईटही नाही.
एकदा बघायला हरकत नाही.

Leave a comment