विनोद

एकदा जिजाबाई आणि शिवाजी महाराज पत्ते खेळत बसलेले असतात…
तेंव्हा जिजाबाई म्हणतात, “शिवबा, तो बघ, तो खिडकीतून दिसणारा किल्ला आमच्या मनात घर करून राहिला आहे, तो घेऊन ये”
आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून शिवाजी महाराज लगेच घोड्यावर मांड टाकून जातात.
१५-२० मिनिटांनी परत येऊन म्हणतात, “मांसाहेब तो किल्ला आपलाच होता”.
जिजाबाई म्हणतात, “मला माहित होते, पण मला तुझे पत्ते बघायचे होते”




परत एकदा जिजाबाई आणि शिवाजी महाराज पत्ते खेळत बसलेले असतात…
खिडकीतून एक किल्ला दिसतो… पण ह्या वेळेला जिजाबाई काहीच म्हणत नाहीत…आणि तो किल्ला त्यांच्या मनात घर ही करत नाही
एकदम अचानक कसला तरी मोठा आवाज येतो…
त्याबरोबर शिवाजी महाराज म्हणतात, “कोण आहे रे तिकडे”.
आवाज ऐकून जवळचा एक शिपाई तेथे येतो आणि म्हणतो, “हुकूम महाराज”.
शिवाजी म्हणतो, “इस्पिक”

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑