Calendar विषयी थोडेसे…

‘हा हा’ म्हणता January २००७ संपत आला. ‘ही: ही:’ म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि ‘संपत आला असता’ म्हणजे ‘संपत’ नावाचा माणूस नाही, ‘महीना संपतच आला असता’…शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)

नुकतीच TV वर ‘Kingfisher Swimsuit Calendar’ ची बातमी पाहिली आणि माझे मन भरुन आले. calendar पाहुन नाही तर ‘अशा’ प्रकारचे पण calendar असु शकते हे पाहुन. आमच्याकडच्या calendar वर फोटो असलेच तर ते कुठले तरी स्वामी, सदगुरु, जगदगुरु आणि तत्सम मंडळी यांचे असतात. किंवा उरलेली सगळी calendars ही bank, किंवा सहकारी संस्था इत्यादी ची (थोदक्यात म्हणजे ‘फुकट’ मिळालेली) असतात. ह्या वर्षी ‘सुवर्ण सहकारी bank बुडल्यामुळे ते एक calendar नाही मिळाले. खरे तर त्यांची जास्तीत जास्त calendars घेऊन शक्य तितके पैसे वसुल करयचे असे लोकांनी ठरवले होते (तुका म्हणे त्यातल्या त्यात!) पण लोकांच्या पदरी तिथे ही निराशाच आली.

ती bank आमच्या आडनाव बंधूंचीच असल्या मुळे मीही जास्त तीव्र टीका करु शकत नाही . पण माझ्या हितशत्रुंनी मात्र ह्याच फ़यदा घेतला. काही जण नुसतेच ‘आगाशे यांचा धिक्कार असो’ असे ओरडत माझ्या घरावरुन गेले असे मी ऐकले. असो.

तर आत्ता माझ्या समोर जे calendar आहे त्यात January महिन्यात ३ सदगुरु, २ महर्षी, १ स्वामी, १ नेतजी, २ जगद्गुरु आणि २-३ local level चे महाराज यांच्या जयंत्या/पुयतिथ्या आहेत. आत ह्यातले १ स्वामी (स्वमी विवेकानंद) आणि एक नेताजी (सुभाष चंद्र बोस) सोडले तर बाकिच्यांची power पुणे शहर किंवा जिल्हा पातळीवरच मर्यादीत आहे. पण तरीही ते जगदगुरु आहेत. असो. पण अशा प्रत्येक जिल्ह्यात तिथले local ‘जगद्गुरु’ असणार. म्हणजे आपल्या देशात ३१ दिवसातले २०-२२ दिवस फक्त ‘महापुरुष’ जन्माला येतात. किती थोर आपला देश!!

मागे एकदा (आणि बहुतेक ह्या वर्षीही) कुठल्याशा संस्थेने मराठी साहित्यिक/ कवी ह्यांच्या वर एक calendar काढले होते. चांगली कल्पना होती ती. पण तिथे म्हणजे त्या साहित्यिकाचा फक्त फोटो देऊन भागलं नाही. तर त्याचे नाव, तो का ‘थोर’ आणि ‘सुप्रसिद्ध’ आहे हे सांगणारा अल्प परिचय (बहुतेकांना त्यांनी काय काय लिहिले आहे ते माहितीच नसते) ही द्यावा लागल. त्या मुळे प्रत्यक्ष calendar ला जागा अपुरी पडु लागली.

सत्पुरुष लोकांच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही. नावामागे काही तरी विशेषण जोडले की झाले. ते बहुतेक वेळा ‘प्रकट’ होत असल्याने आणि नंतर ‘समाधि’ घेत असल्यामुळे जन्म-म्रुत्युची नोंद नसतेच. शिवाय नुसते ‘चमत्कार’ करणे किंवा ‘दैवी प्रसाद’ देणे हेच मुख्य आणि एकमेव काम असल्यामुले त्यांनी काय लेखन केले आहे, समाज प्रबोधन केले आहे ह्यासाठी calendar ची जागा अडवली जात नाही. ऎखादा उग्र (आणि अल्प कपड्यातला) फोटो पुरेसा होतो. असलिच थोडीशी जागा तर त्यांचा एखादा पट्ट-शिष्य (जो businessman/ राजकारणी ही असतो) त्याचा फोटो टाकता येतो.

नरेंद्र दाभोळकर ह्यांच्या एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे: संत ज्ञानेश्वर, संत तुकराम, रामदास स्वामी ह्यांना मी मानतो. कारण त्यांनी खरोखर अभंग, ओवी ह्यातुन समाज प्रबोधन केले. बाकी काही विचार नाही पटले तरी एक कवी म्हणुन/ साहित्यीक म्हणुन तरी त्यांनी कार्य केले. पन हे हल्लीचे अमुक महाराज (दाभोळकरांनी गजानन महाराज, साइबाबा, अक्कलकोट महाराज इत्यादी ना पण त्यातच जमेस धरले आहे, जे माझ्या मते बरोबर आहे) काहीच करत नाहीत.’

पुर्वीचे नेते पण तुरुंगात गेले तरी लेखन/ चिंतन करायचे. टिळकांनी ‘गीतारहस्य’, नेहरुंनी ‘Discovery of India’ etc. हे तुरुंगातच लिहिले. आपले सध्याचे नेते एक तर तुरुंगात जातच नाहीत, आणि गेलेच तरी असे काही लेखन करणे निव्वळ अशक्य! Just imagine की शिबु सोरेन किंवा लालु किंवा सिद्धु तुरुन्गात बसून ‘गीता-रहस्य’ किंवा तत्सम ग्रंथ लिहित आहेत -:)

/
>पण ह्या calendar च्य बाबतीत एक चांगला प्रयोग म्हणजे, सगळ्या खेळाडुंची चित्रे असलेले calendar तयार करावे. आणि त्यामधे कुठल्याही धार्मिक दिवस, सण, जयंत्या इत्यादी ऐवजी त्या त्या महिन्यातल्या main sports events असे दिले तर किती सुरेख calendar तयार होइल. म्हणजे June-July mahinyaat Wimbledon चे schedule, cricket/ football/ Chess etc. main tournament चे schedule असे दिले आणि वर एकेक खेळाडुचा फोटो (ज्याचा त्या महिन्यात वाढदिवस आहे) असे दिले तर फारच उत्क्रुष्ट calendar तयार होइल.

फक्त प्रश्न असा आहे की बुवा/ महाराज ह्यांच्या ‘पुण्याइ’ समोर ह्या ‘सामान्य’ खेळाडुंची power कितिशी उपयोगी पडणार आणि ही calendars कोण विकत घेणार?

~ कौस्तुभ

5 thoughts on “Calendar विषयी थोडेसे…

Add yours

  1. rofl.. tujhya blog madhale suruvatiche sagle pj vachle atta:))) sahi..:)) kahi adhi mahit hote tari vachun solid maja ali parat:))

    Like

  2. rofl.. tujhya blog madhale suruvatiche sagle pj vachle atta:))) sahi..:)) kahi adhi mahit hote tari vachun solid maja ali parat:))

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: