On Brevity, Simplicity, and Minimalism

श्री. भा.म. गोरे यांचा नवी पालवीनावाचा एक लघुकथासंग्रह वाचताना प्रास्ताविकात एक संस्कृत ओळ आली. 
 
अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |
त्याचा अर्थ आणि पूर्ण सुभाषित काय आहे म्हणून नेटवर बघितले तर हे पूर्ण सुभाषित मिळाले.
अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |
बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः ||
 
अर्थ:
 
थोडक्यात आणि सुंदर भाषेत जो सांगतो तो खरोखर [चांगला-फर्डा] वक्ता होय. खूप बडबड करून त्यातून थोडासाच अर्थ निघत असेल तर त्याला वाचाळ म्हणावे.
 
शेक्सपिअर च्या हॅम्लेट मधील एक पात्र (पोलोनिअस) म्हणते:
 
Therefore, since brevity is the soul of wit,
And tediousness the limbs and outward flourishes,
I will be brief…
 
मितभाषी किंवा अल्पाक्षरी असणे हे खूप अवघड असते. आणि बऱ्याचदा साहित्यिक दर्जाचे प्रमाण मानले जाते.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास यांचे अभंग, श्लोक, ओवी इ. बघितले तर दोन गोष्टी अगदी ठळक पणे जाणवतील: (१) साधेपणा (Simplicity) आणि (२) अतिशय कमी शब्दात आशयगर्भ कल्पना मांडणे (Brevity).
असे लेखन इतके प्रभावी असते की त्याचे “निरूपण” करण्यात लोकांचे आयुष्य जाते (किंवा काहींची “कारकीर्द घडते”!).
उदा: “नाही निर्मळ मन, काय करील साबण”, “सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती” वगैरे
फक्त मराठीच नाही तर कोणत्याही भाषेतल्या साहित्यामध्ये Brevity ला खूप महत्व आहे.
It is considered as a hallmark of Classic literature.
Friedrich Nietzsche said: “It is my ambition to say in ten sentences what what others say in a whole book”
ह्याबाबतीतली नोबेल पारितोषिक विजेते लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा एक प्रसंग सुप्रसिद्ध आहे. हेमिंग्वे यांच्या “द ओल्ड मॅन अँड द सी” ला साहित्याचे नोबेल पारितोषिक आणि पुलित्झर पारितोषिक मिळाले. केवळ १२७ पानांची ही कादंबरी आहे. त्यावरून हेमिंग्वे यांच्यावर बरीच टीका ही झाली. पण हेमिंग्वे यांचे म्हणणे होते की “Brevity” हे खूप उच्च दर्जाच्या साहित्यिकांचे लक्षण आहे.
तेव्हा कोणीतरी हेमिंग्वे ला आव्हान दिले की फक्त ६ शब्दात काहीतरी आशयपूर्ण कथा लिहून दाखव. आणि हेमिंग्वे नी लिहिले :
“For Sale. Baby Shoes. Never Worn.”
एका वृत्तपत्रातल्या जाहिराती सारखे हे ६ शब्द, पण त्यात एक खूप करुण कथा लपलेली आहे. म्हणजे एका आईनी दिलेली ही जाहिरात आहे. त्या आईचे बाळ जन्मत:च दगावते असा मतितार्थ आहे. त्या आईने बाळासाठी बेबी शूज घेतलेले असतात – जे दुर्दैवानी कधीच वापरायची वेळ येत नाही.
हेमिंग्वे ची ही कथा खूप प्रसिद्ध झाली आणि त्यावरून “flash fiction” किंवा fiction of extreme brevity हा साहित्य प्रकार रूढ झाला आणि त्यात नवे नवे प्रयोग झाले. त्याला “6 word tale” असेही म्हणतात.
“Wired” (वायर्ड) मॅगझीन ने अशा “6 word” stories च संकलन मागे एकदा प्रसिद्ध केलं होतं (Link: http://www.wired.com/wired/archive/14.11/sixwords.html)
असो. तर हे बराच विषयांतर झालं. पण मूळ मुद्दा होता Brevity” बद्दल. 
 
थोडा खोलवर विचार केला तर Brevity (मिताक्षरीपणा), Simplicity (साधेपणा), Less is More, Frugality (अत्यंत वाजवी खर्चात राहणे), De-clutter (पसारा टाळणे) हे सगळे एकाच Theme ची वेगवेगळी रूपे आहेत. आणि ती Theme म्हणजे Buddhism (बुद्ध धर्मात) मधले महत्वाचे तत्व – minimalism. मराठीत ह्याला “न्यूनतावाद” असा छोटा पण बोजड शब्द आहे!
 
Minimalism ची वेगवेगळी रूपे साहित्य, कला, कायदा, शास्त्र, इतकेच नव्हे तर गणित इ. विषयात सतत दिसून येतात. ह्याबद्दलचे अनेक उद्गार (Quotes) प्रसिद्ध आहेत. 
 
शास्त्र:
albert-einstein-quote
 
कायदा:
in-the-pleading-of-cases-nothing-pleases-so-much-as-brevity-quote-1
 
साहित्य:

marcustulliuscicero1

friedrich-nietzsche-sayings-about-yourself-quotes-brevity-talent

 
कला:
“A picture speaks a thousand word” ही म्हण प्रसिद्ध आहे. लिओनार्दो द विंची याने पण “Simplicity” ला सगळ्यात जास्त महत्व दिलं होतं.
 
DaVinci-quote
 
गणित:
 
नुकतेच मंजुळ भार्गव ह्या भारतीय गणितज्ञाची थोर भारतीय गणिती रामानुजन यांच्याबद्दलची एक मुलाखत पाहिली. त्यात भार्गव यांनी सांगितले की गणितज्ञ लोकांच्यात “Simple and Elegant असणे किंवा तशा स्वरूपात प्रमेय मांडणे” ह्याला फार महत्व असते. आणि त्या बाबतीत रामानुजन हे फार थोर होते. उदाहरणादाखल त्यांनी रामानुजन यांची काही प्रमेय सांगितली. उदाहरणार्थ:
o-FINAL-FORMULA-570
Ramanujan2
The extremely simple Left Hand Side makes these equations “Elegant”!
सध्याच्या सोशल मीडिया मध्ये Twitter हे इतकं लोकप्रिय व्हायचं एक कारण म्हणजे “Brevity”. ही micro-blogging site Users ना केवळ १४० शब्दात लिहायला भाग पाडते. आणि तेच अनेकांना खूप challenging वाटतं. हेमिंग्वे च्या “सिक्स वर्ड स्टोरी” सारखं.
Brevity ह्या विषयावर इतकं लिहिणं हीच खरं तर Irony (विडंबन) आहे. पण असो. मुळात ह्याची सुरुवात झाली ती एका संस्कृत सुभाषितामुळे. म्हणजे संस्कृत-कालीन लोकांनी पण “Brevity” चं महत्व जाणलं होतं! 
 
म्हणजे आता “न्यू इंडिया” वाल्या लोकांच्या, “हे सगळं भारतामध्येच सुरु झालं, आम्ही आधी केलं” ह्या लोकप्रिय गाण्यात अजून एक ओळ (किंवा कडवं) जोडले जाणार…हरी ओम!
Brevity
minimalism-is-the-pursuit-of-the-essence-of-things-not-the-appearance-quote-1
Minimalism
declutter
declutter
And finally…
DeclutterYourLife-1493660262
P.S:
Trivia: “Sasural Genda Phool / ससुराल गेंदा फूल” song from 2010 Hindi movie  “Delhi – 6” composed by Academy Award winning composer A. R. Rahman won Filmfare Award for Best Playback Singer (Female) category.
So what’s the connection here?
The song was only 2 mins and 50 seconds long (or short!). This is the shortest song to have won a Filmfare Award.
So Brevity can help you win not only reward but Award as well 🙂
Now enjoy the song!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: