ती सध्या काय करते – एक गूढकथा

असे म्हणतात की पहिले प्रेम विसरता विसरत नाही….

असाच एकाचा अनुभव नक्कीच वाचा. कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या… 😊😊😊

अज्ञात क्रमांक (Mobile #) पाहून सुरेशने नाक मुरडतच विचारले “कोण ?”

समोरचा मंजुळ आवाज विचारत होता, “सुरेश का ?”

आवाज एकदम ओळखीचा वाटला. मग सुरेशने विचारले “हो, आपण ?”

मी रोल नंबर २९…” आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले, “रोल नंबर २९”?

“हो, मी roll no २९ बोलतेय ! “.

हळूच स्वयंपाकघरात डोकावलं, तर बायको पोळ्या लाटण्यात मग्न होती.

सुरेश हॉलमधून गच्चीवर आला. छातीची धडधड आता वाढली होती, श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असं वाटू लागलं.

नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो, तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या रोल नंबर २९ ला आज आपली गरज लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला.

आता काय बोलाव हे कळतच नव्हतं, पण तिचा आवाज ऐकून तो परत भानावर आला, “काय कुठे आहेस ? खूप वर्षात भेट नाही, फोन नाही, शशीने नंबर दिला म्हणून फोन करतेय.”

तिचा आवाज ऐकतच रहाव असं त्याला वाटत होत.

आता मात्र तिने अजून एक बॉंब टाकला, “भेटायचय होतं तुला, कधी वेळ आहे ?”

त्याला क्षणभर वाटल म्हणावं, “तुझ्यासाठी कधीपण”,

पण मनाला आवर घालत तो म्हणाला “रविवारी”.

तिने पुन्हा विचारले, “कुठे भेटूयात, तुझ्या घरी कि माझ्याकडे येतोस ?”

आता त्याला स्वर्ग दोन बोटेच उरला होता. अजून हुरूप आला “एखाद्या तटस्थ ठिकाणी भेटूयात का ?”

“कुठे ही चालेल… ” —- ती.

मग त्याने शहरातील एका मोठ्या शानदार हॉटेलच नाव सुचवलं. भेटीचं ठिकाण आणि वेळ निश्चित झाली. आता पुढचे चार दिवस त्याला युगापेक्षाही मोठे वाटू लागले.

अचानक एक छान जॅकेट घेवून तो घरी आला. एक दिवस सलून मध्ये जाऊन फेशिअल मसाज थोड्या भुऱ्या झालेल्या केसांना रंग, असं सगळा सेटअप बदलला. नवऱ्यातील बदल पाहून, बायकोने विचारले, तर रविवारी फार महत्वाची मिटिंग आहे असं सांगून वेळ मारून नेली. ती भोळी होती. तिला गैर काहीच नाही वाटलं. नाकासमोर आयुष्य जगणाऱ्या जोडीदाराला आतून होणाऱ्या गु्दगुल्या तिला जाणवल्या नाहीत.

हजारो रुपये बूट, गॉगल यावर खर्च होत होता, पण तिच्या भेटीपुढे पर्वा नव्हती.

रविवार उजाडला. सकाळपासून स्वारी एकदम खुशीत होती. पाच वाजले. टॅक्सी दारात येवून उभी राहिली. बायकोने शुभेच्छा दिल्या. मुलानंही बाबा कोणत्या तरी कामगिरीवर चाललाय असं वाटून नमस्कार केला.

गाडी हॉटेलच्या दारात थांबली. ती हातात गुलाब घेवून त्याची प्रतीक्षा करत होती. तिच्याकडे पाहून हरखून गेला. दोघं आत जावून बसले. महागड्या डिश ऑर्डर केल्या गेल्या. बिल पण साहेबांनी डेबिट कार्डने भरलं.

सगळं कस छान पार पडलं. बँक शिल्ल्कीचा फज्जा उडाला होता. पण हा आनंद परत मिळणार नव्हता. समुद्रकाठी जावून बसण्याचा तिचा प्रस्ताव ऐकून हा तर खुलूनच गेला…

नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

थोडा वेळ वाळूत बसल्यावर तिने पर्स मधून काही कागद काढले, आणि “यावर सही करशील का ?” असं लडिवाळपणे विचारले.

विमा पॉलीसीचे कागद पाहून तो थबकला.

ती म्हणाली बाकीची सर्व माहिती आपण बोलत असताना मी नोट केलीय, फॉर्म मी नंतर भरेन, तू फक्त सही कर.

सही झाली आणि हप्ते सुरु झाले.

दर हप्त्याला आठवणी ताज्या होत राहिल्या…

LIC जिंदाबाद!

😀😂🤣

.

.

.

.

.

.

म्हणून हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की…

.

.

.

.

.

“ती सध्या काय करते?” 🤔🤔🤔

😁😁😊😊

ता.क.: गोष्ट काल्पनिक असली तरी Roll Number खरा आहे! 😎

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑