विनोद: रामायण आणि महाभारत

कोणी तरी एका वकीलाला विचारले, “महाभारत आणि रामायण यांमध्ये कोणता फरक आहे?”

वकीलाने एकदम वकिली भाषेत उत्तर दिले:

“महाभारतामध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण ही अपहरणाची (kidnapping) केस होती.”

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते:

हरणाचं वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण

आणि

वस्त्राचं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत!

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑