काल अचानक शोधता शोधता स्वप्नील करकरे याच्या Youtube चॅनेल वर येऊन थांबलो. माझा Linkedin वरचा connect स्वानंद केळकर याची ह्या channel वरची मुलाखत दिसली. त्याबद्दल पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहीन. पण त्याच वेळेस अजून एक चर्चा नजरेस पडली ती म्हणजे डॉ. आशिष कुलकर्णी या इकॉनॉमिक्स च्या प्रोफेसर ची. स्वप्निलच्या चॅनेलचे नावाचं “econगल्ली” असे आहे. त्यावर तो Economics and Finance या विषयाशी संबंधित मुलाखती किंवा content पोस्ट करतो.
इकॉनॉमिक्स हा माझा आवडता विषय असल्यामुळे (माझा जन्मच ऍडम स्मिथ आणि जॉन मेनार्ड केन्स यांच्या जन्मदिवशी झाला आहे!) मी ही मुलाखत लगेच पाहिली आणि खूप आवडली. इकॉनॉमिक्स या विषयाच्या दृष्टीने बेसिक असली तरी विषय सोपा करून सांगायची पद्धत आवडली.
म्हणूनच इथे ही मुलाखत शेअर करत आहे …
