मराठी पॉडकास्ट आता हळूहळू रुजत आहेत. गेल्या काही आठवड्यात मी २-३ पॉडकास्ट बद्दल लिहिलं आहे. अजूनही Spotify सारख्या ऍप्स वर मराठी पॉडकास्ट दिसत नाहीत. पण Youtube चॅनेल च्या माध्यमातून मुलाखत या स्वरूपात मराठी पॉडकास्ट सुरु झाले आहेत.
अनेक पॉडकास्ट अजूनही पाचकळ, उथळ, करमणूक स्वरूपाच्या गप्पा यावरच भर देत आहेत. त्यांना मी जमेत धरत नाही. पण काही वेग-वेगळ्या आणि महत्वाच्या, बोल्ड विषयांवर पण चर्चा घडवून आणत आहेत. त्यातला एक विषय म्हणजे “सेक्स एज्युकेशन”. यावर काही मराठी Youtube चॅनेल्स आहेत. तशीच एक मुलाखत नुकतीच पाहण्यात आली.
तुम्हाला अशा चर्चांमध्ये रुची असेल तर नक्की बघा. उगाच सवंग, उथळ आवड असेल तर ह्यात तसे काही नाही.

Leave a comment