नुकतेच म्हणजे ४ आठवड्यापूर्वी अमृता प्रीतम यांचे जोडीदार कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन झाले.
अमृता प्रीतम या प्रसिद्ध कवियत्री, पंजाबी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेत्या होत्या. त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर प्रचंड प्रेम होते. तसे त्यांचे लग्न प्रीतम सिंग यांच्याशी झालेले होते, पण प्रेम साहिरवर.
आणि इमरोज (मूळ नाव इंद्रजितसिंग) यांचे अमृता प्रीतम यांच्यावर निस्सीम प्रेम. इतके की ते दोघे ४० वर्षे एकत्र राहिले. पण नातं काही नाही. नात्याला रूढ अर्थाने नाव नाही.
ह्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल साधारण २० वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकून, वाचून (खरं तर चौकोन, जर प्रीतम सिंगना पण धरलं तर) मला नवल वाटलं होतं …पण तेव्हा जास्त भर अमृता प्रीतम आणि साहिर यांच्यावर होता, आणि अजून एक तिसरा म्हणून इमरोज.
पण नुकतेच इमरोज यांचे निधन झाल्यावर त्यांच्याबद्दलचा लोकसत्ता मधील लेख आणि बातमी वाचून त्यांच्याबद्दल विशेष कुतूहल आणि जिव्हाळा वाटला.
त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक शोधत असताना मला Youtube वर एक सुंदर मराठी भाषेतला tribute सापडला – “मैं तुझे फिर मिलुंगी“! आणि तोच इथे share करावासा वाटला. त्याचे लेखन आणि वाचन दोन्ही खूपच छान आहे (फक्त काही हिंदी उच्चारांचे मराठीकरण झाले आहे, तेवढे सोडून द्यावे).
उत्कट आणि platonic असं अमृता आणि इमरोज यांच्या नात्याचं, विशेषतः इमरोज यांच्या प्रेमाचं वर्णन करता येईल. मला आवडले आणि कोणाला तरी पाठवावेसे वाटले…असो.
लेख ★मैं तुझे फिर मिलुंगी…★लेखक-अॅड.सुनील पाळधीकर ★अभिवाचन-दत्ता सरदेशमुख

Leave a comment